Take a fresh look at your lifestyle.

आर्थिक मुद्द्यावर चिदंबरम यांनी दिलाय मोदी सरकारला ‘मंत्र’; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

मुंबई : करोना काळात देशासमोरील संकटात रोजच वाढ होत आहे. तर दुसरीकडे विरोधकही सरकारच्य अपयशावर जोरदार टीका करत आहेत. करोनाचा देशाच्या अर्थव्यवस्थेस जबर फटका बसला आहे. देशाचा जीडीपी कमी झाला आहे. या मुद्द्यावर काँग्रेस पक्षाने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेसे नेते पी. चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर टीका करत सरकारला आवाहन केले आहे.

Advertisement

करोनाच्या पहिल्या लाटेत देशव्यापी लॉकडाउन लावण्यात आला होता. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले. पहिली लाट ओसरल्यानंतर अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत असतानाच दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्थेस पुन्हा फटका बसला आहे. २०२०-२१ या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत सकारात्मक स्थितीत होती. जानेवारी ते मार्च या तिमाहीत आर्थिक वाढीचा दर १.६ टक्के नोंदवण्यात आला. मात्र, तरीसुद्धा जीडीपीत घसरण झाल्याचे दिसून आले आहे.या मुद्द्यावर चिदंबरम यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आताच्या या आव्हानात्मक परिस्थितीतून बाहेर पडायचे असेल तर सरकारला अर्थतज्ज्ञ आणि विरोधकांचे ऐकावे लागेल, तसेच आपल्या चुका दुरुस्त कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

मागील वर्षात करोनाची पहिली लाट ओसरल्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर येत होती. अर्थव्यवस्थेस सुधारणा होण्याचे संकेतही मिळत होते. अशा वेळी प्रोत्साहन पॅकेज जाहीर करुन अर्थव्यवस्थेस आणखी पाठबळ देण्याची गरज होती. मात्र, अकार्यक्षमता आणि आर्थिक व्यवस्थापनातील गोंधळाने अर्थव्यवस्थेची स्थिती आणखी बिकट केली आहे, अशी टीका चिदंबरम यांनी केली. आताही परिस्थिती बिकट आहे. अर्थव्यवस्था आणखी बिकट स्थितीत येऊ द्यायची नसेल तर सरकारला आताच काही महत्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले.

Advertisement

दरम्यान, काँग्रेसच्या नेत्यांनी याआधीही सरकारला काही सूचना केल्या होत्या. तज्ज्ञ सुद्धा वेळोवेळी सरकारला इशारा देत होते. मात्र, याचा फारसा फरक पडला नाही. कारण, सरकारने याकडे दुर्लक्ष केले. परिणामी, दुसऱ्या लाटेत देशात गंभीर परिस्थिती निर्माण झाली. या काळात अर्थव्यवस्थेचे नुकसान तर झालेच. शिवाय लाखो लोकांचे रोजगार गेले. देशात गरीबी वाढली. उद्योग-व्यवसाय अडचणीत आले. देशांतर्गत व्यापाराचे कोट्यावधींचे नुकसान झाले. देशाचा जीडीपी कमी झाला, यांसारख्या अनेक समस्या उद्भवल्या आहेत.  आता या समस्या दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांना तातडीने ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता राहणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply