Take a fresh look at your lifestyle.

MPSC तर्फे होणार ‘ती’ पदभरती; पहा नेमका काय निर्णय झालाय मंत्रीमंडळ बैठकीत

पुणे : सध्या महाराष्ट्रातील प्रत्येक विभागामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरभरती करणे आवश्यक आहे. मात्र, करोना काळात राज्याची आर्थिक परिस्थिती नाजूक झाल्याने आणि आरक्षणाचे विषय प्रलंबित असल्याने नोकरभरती करण्यास राज्य सरकार धजावत नाही. तशीच परिस्थिती केंद्र सरकारची आहे. त्यांनी तर लष्कर भरतीही कमी केली आहे. अशावेळी आता उद्योग निरीक्षक (गट क,अराजपत्रित) या पदाची निवड यापुढे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत झाला आहे.

Advertisement

उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडील उद्योग संचालनालय व क्षेत्रीय कार्यालयातील उद्योग निरीक्षक (गट क,अराजपत्रित) या पदाची निवड यापुढे जिल्हा निवड समितीकडून न करता, ही पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे भरण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठक झाली. त्यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply