Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. ‘त्या’ जिल्ह्यात होणार सरासरीपेक्षा कमी पाऊस; पहा काय म्हणतोय हवामान अंदाज

नाशिक : यंदाच्या मॉन्सून काळातील पावसाचा सुधारित अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD) जारी केला आहे. त्यानुसार महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात आणि भागात सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. जून ते सप्टेंबर या कालावधीत देशभरात १०१ टक्के पावसाची शक्यता वर्तवली असतानाच मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाला वाटते.

Advertisement

अंदमानात पोहोचलेला मॉन्सून केरळात येण्यास उशीर होत आहे. मॉन्सून केरळात थोडा उशिरा म्हणजे ३ जूनपर्यंत येण्याची शक्यता असतानाच सुधारित अंदाजामध्ये मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज असल्याचे म्हटलेले आहे. हवामान खात्यांचे महासंचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी याबाबतची माहिती सांगितली आहे. जम्मू-काश्मीर, लेह आणि लडाख प्रदेशात सामान्यपेक्षा काहीसा कमी पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Advertisement

तर, महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, जळगाव, धुळे आणि मराठवाडा भागातील अनेक ठिकाणी सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. एकूणच करोना संकटाशी लढणाऱ्या शेतकऱ्यांना या बातमीने झटका बसणार आहे. कारण, शेतमाल विकण्याची पंचाईत असतानाच आता पाऊस कमी झाल्यास त्याही संकटाशी शेतकऱ्यांना दोन हात करावे लागणार आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply