Take a fresh look at your lifestyle.

‘मी पुन्हा येईन’चा महाविकास आघाडीला होतोय फायदा; राष्ट्रवादीने केला महत्वाचा दावा..!

मुंबई : ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा विधानसभा निवडणुकीत खूप गाजली होती. तत्कालीन मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या स्टाईलने त्यावेळी निवडणुकीत बाजी मारालीही. मात्र, शिवसेनेने त्यांचे मनसुबे धुळीला मिळवत थेट विरोधी असलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी यांच्याशी घरोबा करून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन केली. आताही पुन्हा भाजपची सत्ता लवकरच येणार असल्याचे फडणवीस आणि भाजपचे अन्य नेते म्हणत असतात. त्याचा महाविकास आघाडीला फायदा होत असल्याचा दावा राष्ट्रवादीने केला आहे.

Advertisement

याबाबत बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटले आहे की, भाजपचे नेते सत्ता येणार असे वारंवार सांगत तारीख पे तारीख देत आहेत. पण एकही भविष्यवाणी सत्य होत नसल्याने ते हताश झाले आहेत. त्यामुळेच महाविकास आघाडी सरकार विरोधात एककलमी कार्यक्रम हे नेते राबवत आहेत. इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले आमदार स्वगृही परतू नयेत या भीतीमुळे राज्यात लवकरच सत्ता येणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. एकूणच भाजपच्या राजकारणाचा तिन्ही पक्षाला फायदा होत असल्याकडे मलिक यांनी लक्ष वेधले आहे.

Advertisement

त्यांनी पुढे म्हटले आहे की, कोरोना, चक्रीवादळ, अवकाळी पाऊस अशा अडचणी आलेल्या असतानाही या सर्व परिस्थितीला मात देऊन जनतेला मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारने घेतली असल्याने जनता संतुष्ट आहे. पण सत्ता येणार असे बोलून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम भाजप नेते करत आहेत. आता मलिक यांच्या या टीकेवर महाराष्ट्र भाजपचे नेते काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

NCP on Twitter: “इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले आमदार स्वगृही परतू नयेत या भीतीमुळे राज्यात लवकरच सत्ता येणार असल्याचे भाजप नेते सांगत आहेत. परंतु महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकजुटीने काम करत आहेत. @nawabmalikncp @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply