Take a fresh look at your lifestyle.

अरे हे सोप्पंय की.. ‘हे’ पदार्थ खाऊन नैसर्गिकरित्या वाढवा शरीराची ऑक्सिजन क्षमता..!

करोनाच्या दुसऱ्या लाटेत सगळेच हतबल झालेले होते. निवडणुका आणि आपणच राजकीयदृष्ट्या सक्षम असल्याची बतावणी करण्यामध्ये अडकलेल्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याचा फटका आपण सर्वांनी सहन केला. त्यातूनच दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनअभावी अनेकांचा मृत्यू झाला. त्यामुळेच आज आपण ऑक्सिजन क्षमता वाढवणारी माहिती पाहणार आहोत.

Advertisement

साथीचे आजार टाळण्यासाठी सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करण्याबरोबरच बरेच पौष्टिक तज्ञ आणि प्रशिक्षकदेखील आपल्या आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला देत आहेत. ते अधिक अँटीऑक्सिडेंटयुक्त पदार्थ खाण्याची सूचना देत आहेत, जेणेकरून शरीरातील ऑक्सिजनची पातळी कायम राहील. शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढवणारे पदार्थ शरीराला आजारांपासून वाचवतात आणि प्रतिकारशक्तीला चालना देतात. या व्यतिरिक्त ते आमच्या पेशी सुरक्षित आणि निरोगी ठेवतात. लोह आणि नायट्रेट्स समृध्द अन्न संपूर्ण शरीरात ऑक्सिजनचा पुरवठा वाढवते. म्हणून बीटरूट, पालेभाज्या, डाळिंब, लसूण, कोबी, फुलकोबी, अंकुरलेले धान्य, मांस, शेंगदाणे आणि बियाणे हे अन्नपदार्थ जास्त प्रमाणात खावे. नायट्रेट्स, लोह, फॉलिक अॅसिड, बी 12 समृध्द असलेले अन्न रक्तात लोह शोषण्यास मदत करते आणि ऑक्सिजन वाहून नेण्याची क्षमता वाढवते.

Advertisement

डॉक्टर सांगतात की चांगल्या आहाराबरोबर पुरेसे पाणी पिणेही फार महत्वाचे आहे. आपल्या पेशींना श्वास घेण्याची आवश्यकता असते आणि जेव्हा आपण पुरेसे पाणी पितो तेव्हा आपले शरीर पेशींमध्ये ऑक्सिजन पोचवते. म्हणून नियमितपणे प्या. कमी मीठयुक्त आहारदेखील महत्त्वपूर्ण आहे. कारण तो केवळ हृदय आणि रक्तदाबसाठीच चांगला आहे असे नाही. जास्त मीठामुळे श्वास घेण्यास अडचण येऊ शकते. कमी पोटॅशियममुळे श्वास घेण्यात अडचण येते. म्हणून अशावेळी केळी, बीटचा रस फायदेशीर ठरतो. आवश्यक असल्यास उन्हाळ्यात इलेक्ट्रोलाइट्स वापरा.

Advertisement

शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढवणारे अन्न खावे. यामुळे शरीरात ऑक्सिजनची पातळी वाढते. रेड मीट, ऑर्गन मीट मांस यामुळे शरीरात लोहाची पातळी वाढते. वनस्पतींच्या पदार्थांमध्ये हिरव्या पालेभाज्या, खजूर, पोहे आणि डाळींमध्ये नॉन-हेम आयरन असते. नॉन-हेम लोह शोषण्यासाठी व्हिटॅमिन सी आवश्यक आहे. म्हणून आवळा, पेरू आणि लिंबू यासारख्या व्हिटॅमिन सी समृध्द फळांचे सेवन करावे. स्पायरुलिना एक नैसर्गिक शेवाळ आहे. हे प्रथिने, अँटिऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि खनिजांचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात अँटिऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत जे पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतात. स्पिरुलिनामध्ये बीटा कॅरोटीन, बी 12, दुर्मिळ फॅटी अॅसिड, गामा लिनोलेनिक अॅसिड असते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply