Take a fresh look at your lifestyle.

लसटंचाईत चीनने घेतलाय हात धुवून; पहा मुजोर व्यापारी धोरणाने कसा सुरू आहे हेकेखोरपणा

दिल्ली : करोना लस किंवा लसीकरणाबाबत बातमी आली, बातमी काय असेल याचे कुतूहल सर्वांनाच आहे. कारण, आज देशात लसींची टंचाई आहे, हे आता जगजाहीर झाले आहे. त्यामुळे आज किती लसी मिळाल्या, लसीकरण सुरू होणार का, असे प्रश्न विचारले जातातच. अशी परिस्थिती सध्या देशात आहे. देशातील नागरिक जसे लसींबाबत विचारतात तसे जगातील अन्य देशही भारत कधी लस देईल याची वाट पाहत आहे. मात्र, या देशांना निदान भारताकडून तरी लवकर लसी मिळणार नाहीत. त्याचाच गैरफायदा चीनने घेतला आहे.

Advertisement

कारण, भारताने आधी देशातील लसीकरण पूर्ण करण्यास प्राधान्य दिले आहे. लस निर्यात पूर्ण बंद केली आहे. त्यामुळे या देशांच्या अडचणी वाढल्या आहेत. भारताकडून लवकर लस मिळणार नाही, हे लक्षात आल्यानंतर काही देशांनी चीनकडे लसींची मागणी केली आहे. चीन लस देण्यास तयार आहे. मात्र, चीन यामध्येही आपला स्वार्थ पाहत आहे. चीनचा तसा स्वभावही आहे म्हणा. स्वभावाप्रमाणेच वागणार. भारताकडून लस मिळाली नाही म्हणून श्रीलंका, बांग्लादेश आपल्याकडे लसची मागणी करत आहेत, हे चीनला माहित आहे. त्यामुळे चीन या देशांना लस तर देत आहे. मात्र, दुप्पट पैसे घेत आहे. या देशांचाही नाईलाज आहे. त्यामुळे त्यांना जास्त पैसे देऊन लस घ्यावी लागत आहे. कोविशील्ड लसीसाठी भारताने एका डोससाठी साडेपाच डॉलर किंमत ठरवली होती. मात्र, चीन त्याच्या सिनोफार्म लसीच्या एका डोसचे तब्बल १५ डॉलर घेत आहे. आता या स्वार्थीपणास काय म्हणावे. संकटाच्या काळात असे प्रकार करणे चीनलाच जमू शकते.

Advertisement

आता तर लसीच्या किमतीच्या मुद्द्यावरही वाद सुरू झाला आहे. याचे कारण म्हणजे, चीन वेगवेगळ्या किमतीत लस विकत आहे. बांग्लादेश दीड कोटी लस खरेदी करणार आहे. लसीच्या एका डोससाठी १० डॉलर देणार आहे. मात्र, हीच लस श्रीलंका १५ अमेरिकन डॉलर देऊन खरेदी करणार आहे. ज्यावेळी चीनच्या या गडबडीचा अंदाज आला, तेव्हा दोन्ही देशांतील माध्यमांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला. सोशल मिडीयाद्वारे नागरिकांनीही यावर मते व्यक् केली. त्यानंतर दोन्ही देशांचे सरकार आणि चीनी दूतावास यांना या मुद्द्यावर स्पष्टीकरण द्यावे लागले. या व्यतिरिक्त अन्य देशांनाही लस देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे आताचा प्रकार पाहता या देशांसाठी लसीचे काय दर असतील, यावर आताच संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply