Take a fresh look at your lifestyle.

करोना लसटंचाई : काँग्रेसने वेधले मोदी सरकारच्या ‘त्या’ दुर्लक्षाकडे लक्ष; पहा नेमके काय आहे त्या चार्टमध्ये

मुंबई : देशात सध्या करोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच लसटंचाईचा मुद्दाही पटलावर आहे. अशावेळी यावर योग्य आणि ठोस मार्ग काढण्यासाठीचे प्रयत्न होताना दिसत नाहीत. मुळात भारताने लस खरेदीसाठी खूप उशिरा कार्यवाही केल्याने येथील लसीकरण टंचाईच्या विळख्यात सापडले असल्याकडे काँग्रेस पक्षाने लक्ष वेधले आहे.

Advertisement

त्यांनी एक इमेज शेअर केली आहे. त्यात एक चार्ट देण्यात आलेला आहे. त्यात म्हटले आहे की, भारताने मुळात कंपन्यांकडे लस खरेदीसाठी खूप उशिरा संपर्क केला आहे. तसेच संपूर्ण देशात लस मोफत मिळण्याचा अधिकार असून त्याकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार लक्ष देत नाही. ‘टीकोत्सव’ हा उत्सव सुरू झाल्यावरच लसीकरणाची गती खूप मंदावली आहे. ब्राझीलसारख्या गरीब देशात 10 टक्क्यांपेक्षा जास्त लसीकरण झालेले असताना मोदींच्या नेतृत्वाखालील भारतात आतापर्यंत फ़क़्त 3.10 टक्के लसीकरण झालेले आहे.

Advertisement

लस उत्पादक कंपन्यांना ऑर्डर देण्यासाठी जगभरातील केंद्र सरकारांनी केलेली कार्यवाहीचे वेळापत्रक असे :

Advertisement
देशाचे नाव ऑर्डर दिलेले महिना व वर्ष लस ऑर्डर संख्या
इंग्लंड मे 2020 9 कोटी
अमेरिका जुलै 2020 20 कोटी
युरोपियन युनियन ऑगस्ट 2020 30 कोटी
जपान जुलै 2020 12 कोटी
ब्राझील ऑगस्ट 2020 9 कोटी
ऑस्ट्रेलिया सप्टेंबर 2020 3.38 कोटी
जर्मनी सप्टेंबर 2020 3 कोटी
भारत जानेवारी 20२१ 1.65 कोटी

 

Advertisement

Maharashtra Congress on Twitter: “Why was the Modi govt so late to the table on vaccine procurement? Were they ignorant, complacent or arrogant? #SpeakUpForFreeUniversalVaccination https://t.co/6DBXsYwSNu” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply