Take a fresh look at your lifestyle.

कुरापतखोर चीनला नडला ‘तो’ उद्योग; पहा कोणता देश भडकलाय चीनवर

दिल्ली : आज अवघे जगच करोनाच्या विळख्यात सापडले आहे. या महामारीतून सुटका करुन घेण्यासाठी प्रत्येक देश धडपडत आहे. मात्र, कुरापतखोर चीन दुसऱ्याच उद्योगात गुंतला आहे. दुसऱ्या देशांना विनाकारण त्रास देण्याचाा नवा उद्योग चीनने सुरू केला आहे. चीनच्या जवळपास १६ सैन्य विमानांनी मलेशियाच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी केल्याने मलेशिया चांगलाच संतापला आहे.

Advertisement

चीनच्या या कुरापतीचा विरोध करण्यासाठी मलेशियाच्या सरकारने चीनच्या राजदूतास तडकाफडकी बोलावून विरोध नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्य या कृत्यामुळे मात्र दोन्ही देशांतील वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. चीनच्या १६ सैन्य विमानांनी देशाच्या हवाई क्षेत्रात घुसखोरी करत नियम डावलले आहेत. देशच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चीनने केलेला प्रकार घातक आहे, असे मलेशियाच्या वायू सेनेने सांगितले. या घटनेवर चीनने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तसे पाहिले तर दक्षिण समुद्राच्या परिसरावर चीन आपलाच हक्क असल्याचा दावा करत आहे. तर ब्रुनेई, मलेशिया, फिलीपीन्स, तैवान, व्हिएतनाम हे अन्य देश सुद्धा या क्षेत्रावर दावा करत आहेत. चीनने या परिसरात अनेक मानवनिर्मित बेट तयार केली आहेत. आता चीन या बेटांचा वापर सैन्य ठिकाणांच्या रुपात करत आहे. याच कारणामुळे या परिसरात तणाव वाढला आहे. चीनच्या उद्योगांना बाकीचे देश अक्षरशः वैतागले आहेत.

Advertisement

याआधी थिटू या बेटाच्या मुद्द्यावर फिलीपीन्सने चीनला चांगलेच फटकारले होते. या परिसरात चीनने आपले सैन्य जहाज आणि मासेमारी करणाऱ्या नौका आणू नयेत, असे फिलीपीन्सने म्हटले होते. चीनने मात्र असे काहीच न करता उलट उत्तर चीन या क्षेत्राचे संरक्षण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे या दोन्ही देशांतही सध्या तणाव आहे. या परिसरातील प्रत्येक देश आता चीनच्या विरोधात आवाज उठवू लागला आहे. अमेरिकेच्याही ही गोष्ट लक्षात आली आहे. त्यामुळे अमेरिका या देशांना पाठबळ देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे सुद्धा चीनने दक्षिण चीन समुद्र परिसरावर जास्त लक्ष केंद्रीत केले आहे. चीनच्या या कारवायांचा त्रास मात्र लहान देशांना सहन करावा लागत आहे. चीनची सैन्य ताकद खूपच जास्त आहे. या ताकदीच्या जोरावर चीन या देशांना त्रास देत आहे. कितीही विरोध केला तरी चीन ऐकण्याच्या मानसिकतेतच नाही. त्यामुळेच या परिसरात आता रोज नवे वाद निर्माण होऊ लागले आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply