Take a fresh look at your lifestyle.

चीनच्या मदतीने ‘तो’ देशही भारताला झटका देण्यास तयार; पहा कोणत्या सेक्टरमध्ये भारताचा क्रमांक घसरणार

दिल्ली : संकटे आली तर ती कधी एकटी येत नाहीत.. असे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत, आणि त्यात काही खोटेही नाही याचा प्रत्ययही आपणास अनेकदा आला आहे. आता करोना संकटातही देशातील नागरिक याचा अनुभव घेत आहेतच. करोना आला खरा मात्र बरोबर अनेक संकटेच घेऊन आला. लॉकडाउनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेस जबरदस्त तडाखा बसला, बेरोजगारी वाढली, गरीबी वाढली, अनेक उद्योग-व्यवसायांना टाळे लागले, व्यापाराचे कोट्यावधींचे नुकसान झाले, देशाचा आर्थिक विकास रोखला, हे कमी म्हणून की काय आता आणखी टेन्शन वाढवणारी बातमी मिळाली आहे.

Advertisement

स्टेनलेस स्टील उत्पादनात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र, लवकरच स्टील उत्पादनात इंडोनेशिया हा देश भारतास मागे टाकण्याची तयारी करत आहे. होय हे खरे आहे. इंडियन स्टेनलेस स्टील डेव्हलपमेंट असोसिएशननेच हा अंदाज व्यक्त केला आहे. सन २०२१ मध्येच इंडोनेशिया स्टील उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर असेल, असे असोसिएशनने म्हटले आहे. संघटनेने पुढे म्हटले, की सध्या इंडोनेशिया स्टील उत्पादनात चौथ्या क्रमांकावर आहे. मात्र, आता ४२ लाख टन स्टील उत्पादन साध्य करत हा देश जपान आणि भारतास मागे टाकण्याची शक्यता आहे. यावर्षात भारतात ३५ लाख टन स्टेनलेस स्टीलचे उत्पादन होण्याची शक्यता आहे. मागील वर्षात देशात ३२ लाख टन स्टीलचे उत्पादन झाले होते.

Advertisement

विशेष म्हणजे, हे उद्दीष्ट साध्य करण्यात चीनच इंडोनेशियास मदत करत आहे. चीनी कंपन्यांनी येथे आधिक कार्यक्षमतेचे संयंत्र बसवले आहेत. याच वर्षात प्रकल्प सुरू होतील असा अंदाज आहे. प्रकल्प सुरू झाल्यानंतर येथे स्टील उत्पादनात मोठी वाढ होणार आहे. जास्तीचे स्टील भारतीय बाजारात देखील पाठवले जाऊ शकते, असे घडले तर देशासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता आहे. करोना संकटात आज देश एकाच वेळी अनेक संकटांचा सामना करत आहे. करोना आटोक्यात आणायचाच आहे. मात्र, या महामारीने ज्या काही समस्या निर्माण केल्या आहेत, त्या सुद्धा दूर करायच्या आहेत. करोनाचा फटका बसल्याने अर्थव्यवस्था कोलमडण्यच्या स्थितीत आहे. देशाचा जीडीपी घटला आहे. मागणी घटल्याने मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रालाही फटका बसला आहे. आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या या घटकांकडे आधिक लक्ष द्यावे लागणार आहे. या घटकांच्या समस्या दूर करण्यासाठी तातडीने काही महत्वाचे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply