Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अखेरीस चीननेही घोषित केला लॉकडाऊन; पहा नेमके कुठे सापडलेत किती रुग्ण

दिल्ली : अवघ्या जगालाच करोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनमध्ये करोना पुन्हा एकदा पसरत चालला आहे. चीनच्या सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ग्वांगदोंग प्रांतातील काही शहरात करोनाचे नवे रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. सध्या या रुग्णांची संख्या कमी असली तरी भविष्यातील धोका पाहता येथे कडक लॉकडाऊन घोषित केला आहे. विशेष म्हणजे, करोनावर नियंत्रण मिळवल्याचा दावा चीनने काहीच दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता पुन्हा करोनाचे रुग्ण सापडल्याने चीनचा हा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.

Advertisement

ग्वांगदोंग प्रांतात करोनाचे ४१ नवीन रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सोमवारपासून कडक निर्बंध लागू केले आहेत. येथून बाहेर जाणाऱ्या लोकांसाठी करोना चाचणी अनिवार्य केली आहे. गुआनझाओ आणि फोसहान शहरांमध्ये वाढते संक्रमण पाहता आतापर्यंत ५१९ विमान उड्डाणे रद्द केली आहेत. सार्वजनिक ठिकाणे आणि बाजार बंद करण्यात आले आहेत, अशा पद्धतीने कडक निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी चीनच्या झेनजियांग शहरात H10N3 बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली. या शहरातील एका ४१ वर्षांच्या व्यक्तीस या विषाणूने संक्रमित केले. त्यानंतर या रुग्णास दवाखान्यात दाखल केल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने सांगितले.

Advertisement

डिसेंबर २०१९ मध्ये चीनमध्येच करोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. त्यानंतर पाहता पाहता हा आजार जगभरात पोहोचला. कोट्यावधी लोक संक्रमित झाले. लाखो लोकांचे प्राण गेले. आजही काही देश या संकटातून बाहेर आलेले नाहीत. दुसरीकडे चीनने मात्र कडक नियमांची अंमलबजावणी करत या आजारावर नियंत्रण मिळवले. त्यामुळे देशात करोनावर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले. चीनने लगेच तसे दावे करण्यास सुरुवात केली. त्यानंतर चीनमधील करोनाच्या बातम्याही फारशा येत नव्हत्या. त्यामुळे चीनने जगाला करोना दिला मात्र, आपल्या देशात त्यावर ताबडतोब नियंत्रण मिळवले, असेच लोकांना वाटत होते. मात्र, ग्वांगदोंग प्रांतात पुन्हा करोनाचे रुग्ण आढळून आल्याने चीनचा हा दावा खोटा असल्याचे आपोआपच सिद्ध झाले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply