Take a fresh look at your lifestyle.

पेन्शनर्सनो आहात ना तयार? वाचा ‘हा’ महत्वाचा नियम, नाहीतर पेन्शन मिळणेच होईल बंद..!

मुंबई : सेवानिवृत्त झाल्यावर राजकारणात किंवा मोठ्या खासगी कंपनीत आपण खुर्च्या उबवू शकता किंवा आपली नोकरीतील नाराजी किंवा एखाद्याच्या चुकीच्या गोष्टीबाबत बोलूही शकता. आतापर्यंत आपण असे करू शकत होता. मात्र, यापुढे त्यातही बंधने आलेली आहेत. होय, आपण केलेल्या भ्रष्टाचाराचे फळ नंतरही चाखू शकता. मात्र, नोकरीमध्ये झालेल्या घटना विसरून जाऊनच तुम्हाला पेन्शन मिळू शकते. कारण, नवा नियम तुम्हाला अशा गोष्टी लिहिणे, बोलणे आणि व्यक्त होण्यापासून परावृत्त करण्यासाठी आला आहे.

Advertisement

देशाच्या अंतर्गत सुरक्षेबाबत केंद्र सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्राने पेन्शन नियमात सुधारणा केली आहे. त्यानुसार आता गुप्तहेर किंवा सुरक्षेशी संबंधित संस्थांचे सेवानिवृत्त अधिकारी परवानगीशिवाय काहीही प्रकाशित करू शकत नाहीत. परवानगीशिवाय साहित्य प्रकाशित करण्याचे काम त्यांनी केल्यास त्यांची पेन्शन बंद केली जाईल. सुधारित नियमांनुसार जबाबदार अधिकाऱ्यास प्रकाशनासाठी देण्यात आलेली सामग्री संवेदनशील आहे की असंवेदनशील आहे किंवा ती संघटनेच्या कार्यक्षेत्रात येते का याचा निर्णय घेण्याचा अधिकार दिलेला आहे. चुकीच्या पोस्टमुळे, पुस्तकामुळे किंवा लेखनामुळे संस्थेची प्रतिमा डागाळल्यास ‘चुकीच्या आशयाची माहिती’ देणाऱ्या अधिकाऱ्यांचे पेन्शन तातडीने थांबवले जाईल.

Advertisement

ANI on Twitter: “No Government servant, who has worked in any Intelligence or Security-related organisation shall make any publication after retirement without prior clearance from the head of organisation: Ministry of Personnel, Public Grievances & Pensions https://t.co/Oz3sUf9CjY” / Twitter

Advertisement

नव्या दुरुस्तीनुसार आता कोणत्याही गुप्तचर किंवा सुरक्षा संबंधित संस्थेच्या अधिका्यांना कोणतीही सामग्री प्रकाशित करण्यास पूर्वपरवानगी घ्यावी लागेल. 1972 च्या कायद्यात सुधारणा करून डीओपीटीने एक नियम जोडला आहे. त्यानुसार सेवानिवृत्तीनंतर आरटीआय कायद्याच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये समाविष्ट असलेल्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांना संस्थेच्या डोमेनशी संबंधित काहीही प्रसिद्धीस परवानगी लागणार आहे. त्यामुळे पुढील काळात भारतीय गुप्तहेराने किंवा एखाद्या पोलीस वा मिलिटरी सैन्य अधिकारी यांनी लिहिलेली पुस्तके वाचण्याची संधी सामान्य जनतेला मिळण्याची शक्यताही कमी झाली आहे.

Advertisement

या संस्था येतात यामध्ये : इंटेलीजेंस ब्यूरो, रिसर्च एंड एनालिसिस विंग,  सेंट्रल इकोनॉमिक इंटेलीजेंस ब्यूरो, प्रवर्तन निदेशालय, नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो, सीबीआई, राजस्व खुफिया निदेशालय, एविएशन रिसर्च सेंटर, स्पेशल फ्रंटियर फोर्स, सीमा सुरक्षा बल, केंद्रीय रिजर्व पुलिस बल, इंडो-तिबेटियन बॉर्डर पुलिस, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल, नेशनल सिक्योरिटी गार्ड, असम राइफल्स, सशस्त्र सीमा बल, स्पेशल ब्रांच (सीआईडी), अंडमान व निकोबार, क्राइम ब्रांच-सीआईडी-सीबी, रक्षा अनुसंधान एवं विकास संगठन, बॉर्डर रोड़ डेवलपमेंट बोर्ड आणि फाइनेंशियल इंटेलिजेंस यूनिट आदि.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply