Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजार टिप्स : तुम्हीही मेंढरांच्या चालीने खेळत नाहीत ना? बसू शकतो मोठाच दणका..!

पुणे : शेअर बाजारात सध्या रॉबीनहूड इन्व्हेस्टर्स मंडळींनी दणक्यात पैसे कमावले आहेत. करोना लॉकडाऊन झाल्यावर अनेकांच्या नोकऱ्या गेल्याने अनेकांनी आपले असतील, नसतील ते अधिक उसने पैसे (Loan Money) घेऊनही शेअर मार्केटमध्ये पैसे लावलेले आहेत. अनेकांचे पैसे त्यामुळे वर्षा-दीडवर्षात थेट दुप्पट झालेले आहेत. त्यांच्यासह शेअर बाजारात पैसे लावून मेंढरांच्या चालीने खेळत असलेल्या मंडळींसाठी ही महत्वाची माहिती आहे.

Advertisement

भारतीय माणूस असो की जगभरातील कोणतेही सामान्यजन, बहुसंख्य फॉलोअर्स असतात. राजकीय विचारसरणीचे जसे फॉलोअर्स असतात तसेच पैसे कमावण्यासाठी किंवा यश मिळवण्यासाठी आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या मंडळीचे फॉलोअर्स असतातच. भारतीय शेअर बाजारात १९९० च्या दशकात हर्षद मेहता (big bull Harshad Mehta) आणि मग केतन पारेख (Ketan Parekh is a former stockbroker from Mumbai) यांना असेच फॉलोअर्स होते. आताही राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) आणि राधाकिसन दमाणी (Radhakishan Damani)  यांना असेच फॉलोअर्स आहेत. झुनझुनवाला आणि दमाणी यांनी कोणते शेअर घेतले आणि विकले याकडे अनेकजण लक्ष ठेऊन असतात. तसेच शेअर बाजारातील टिप्स वाचून, पाहून किंवा चक्क विकत घेऊनही अनेक शेअर्समध्ये गुंतवणूक केली जाते.

Advertisement

तज्ञांचे म्हणणे आहे की, अनुभवी गुंतवणूकदारांची नक्कल करणे हे मेंढ्याच्या कळपाच्या वर्तनासारखेच आहे. यामध्ये गुंतवणूकदार (Investment) त्याच्या जोखीम प्रोफाइलकडे (High Risk) पूर्णपणे दुर्लक्ष करून झोकून देतो. आपण आपले पैसे किती दिवस त्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो हेदेखील माहिती नसणारे आणि मग त्या चक्रव्यूहात (Market Cycle) फसणारे हजारो आहेत. प्रख्यात गुंतवणूकदारांच्या मार्गावर चालताना तुम्ही कधीकधी नफ्याऐवजी तोटा पदरात पाडून घेऊ शकता. कारण, चढ आणि उतार हेच सूत्र निसर्ग आणि व्यवहारात लागू होत असते. जगातील पैसे स्थिर आहेत. फ़क़्त पैसे (Share Market Money) एकाकडून दुसऱ्याकडे जात असतात. म्हणजेच एखाद्याला पैसे मिळतात, म्हणजे दुसऱ्यांचे कमी झालेले असतात. हेच सूत्र शेअर बाजारातही लागू आहे.

Advertisement

अनेकदा मोठ्या गुंतवणूकदारांनी घेतलेल्या शेअर्सच्या बातम्या आल्यावर इतर सगळे ते खरेदी करण्यासाठी धावतात. मग ज्यांची त्यात अगोदरच गुंतवणूक असते त्यांना याचा मोठा फायदा होतो. ते आपले प्रॉफिट बुक करतात. आणि त्याच बड्या इन्व्हेस्टर्सने शेअर विकल्याची बातमी आली की मग त्या स्क्रिप्टचे भाव कमी होतात. मग नंतर गुंतवणूक केलेल्या किंवा जास्तीच्या अपेक्षाने पैसे लावून बसलेल्या मंडळींचे नुकसान होते. अनेकदा अशा बातम्या हाच पैसे कमावण्याचा सापळा असू शकतो. त्यामुळे चांगली कामगिरी करणाऱ्या चांगल्या कंपनीचे शेअर खरेदी करून त्याद्वारे पैसे कमविणे कधीही योग्य. दुसरा मार्ग हा सापळा आणि मेंढरांच्या चालीचा तोटा देणारा खेळ असू शकतो.

Advertisement

झुनझुनवाला सांगतात की जेव्हा-जेव्हा तुम्ही गुंतवणूकीशी संबंधित कोणतीही यशोगाथा ऐकता तेव्हा तुमची भूमिका अजिबात संतुलित नसते. अशा परिस्थितीत आपल्या मनावर विशिष्ट स्टॉकची केवळ सोन्याची चकाकणारी (Gold Side) बाजू दिसू लागते. आपण त्याच्याशी संबंधित जोखीमकडे दुर्लक्ष करतो. हे केवळ नवीन गुंतवणूकदारांच्या बाबतीत होते असे नाही. कधीकधी अनुभवी गुंतवणूकदारांकडूनही त्यापेक्षा अनुभवी गुंतवणूकदारांचे अनुकरण केल्याने तोटा होत असल्याची असंख्य उदाहारणे आहेत. त्यामुळे अभ्यास करून पैसे लावा आणि पैसे कमवा. अजिबात जुगार (gambling) खेळू नका.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply