Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक बातमी : ‘तिथे’ लसही येणार थेट उड के आपल्याकडे; पहा कोणत्या कंपनीने केलीय तयारी

भारताच्या दुर्गम भागात याचा वापर केला जाऊ शकतो. कोविड 19 लससह इतर आपत्कालीन औषधे याद्वारे पुरविली जातील.

मुंबई : देशातील अग्रगण्य एक्स्प्रेस लॉजिस्टिक्स सर्व्हिस प्रोव्हाईडर ब्लू डार्टने गुरुवारी सांगितले की, त्यांनी ब्लू डार्ट मेड-एक्स्प्रेस कन्सोर्टियमची (Blue Dart Med-Express Consortium) स्थापना केली आहे. त्याअंतर्गत ड्रोनच्या सहाय्याने भारतीयांना लस पोहोच केली जाणार आहे. भारताच्या दुर्गम भागात याचा वापर केला जाऊ शकतो. कोविड 19 लससह इतर आपत्कालीन औषधे याद्वारे पुरविली जातील.

Advertisement

तेलंगणा सरकार, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (World Economic Forum), नीती आयोग आणि हेल्थनेट ग्लोबल यांच्या संयुक्त विद्यमाने मेड-एक्सप्रेस कन्सोर्टियमची सुरुवात झाली आहे. ‘मेडिसीन फ्रॉम द स्काई’ (Medicine from the sky) प्रकल्पात ब्लू डार्टने पुढाकार घेतला आहे. नागरी उड्डयन मंत्रालयाने (एमओसीए) तेलंगणामध्ये प्रायोगिक तत्वावर ड्रोन उड्डाणांसाठी (immersive delivery model) आवश्यक नियमात बदल करून या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. प्रकल्पाचे उद्दीष्ट हे आहे की आरोग्य सेवा वस्तू (औषधे, करोना लस, रक्त, निदान नमुने आणि इतर जीवनरक्षक उपकरणे) वितरण केंद्रांमधून विशिष्ट ठिकाणी नेण्यासाठी पर्यायी व वेळ वाचवणारा मार्ग तयार करणे.

Advertisement

यासह जिल्हा वैद्यकीय स्टोअर्स व रक्तपेढ्यांमधून प्राथमिक आरोग्य केंद्रे व सामुदायिक आरोग्य केंद्रांपर्यंत रक्त आणि औषधे व उपकरणे याद्वारे पोहोचविण्यात येणार आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे व सामुदायिक आरोग्य केंद्रांमधून केंद्रीय निदान प्रयोगशाळांमध्ये तातडीने पाठवणेही यामुळे शक्य होईल. ब्लू डार्टचे व्यवस्थापकीय संचालक बाल्फर मॅन्युएल म्हणाले की, आम्ही तंत्रज्ञानाचा नेहमीच वापर करत आहोत. महामारीच्या या काळातही आपला हा प्रवास थांबत नाही. तर,  तेलंगणाचे प्रधान सचिव (आयटी & इंडस्ट्रीज) म्हणाले की, तेलंगणा हे असे एक राज्य आहे जे उदयोन्मुख तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास सक्रिय आहेत. मेडिसीनमध्ये या तत्त्वाच्या धर्तीवर ड्रोनचा वापर केला जात आहे. देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. शहरांप्रमाणेच ग्रामीण भागात आरोग्य सेवा पुरविणे हे त्याचे उद्दीष्ट आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply