Take a fresh look at your lifestyle.

खडसेंच्या घरी झालेय ‘हे’ बोलणे; पहा काय म्हटलेय खासदार रक्षा खडसे यांनी

जळगाव : राज्याचे विरोधी पक्षनेते आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या घरीही भेट दिली होती. त्यावेळी एकनाथ खडसे हे मुंबईत होते. मात्र, त्यावेळी खडसे आणि फडणवीस यांच्यात बोलणे झाल्याची माहिती भाजपच्या खासदार आणि एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे यांनी दिली आहे.

Advertisement

मुक्ताईनगर तालुक्यातील केळी बागांची पाहणी केल्यावर राजकीय विरोधक असलेल्या एकनाथ खडसे यांच्या घरी फडणवीस गेले होते. खासदार रक्षा खडसे या भाजपच्या असून त्यांनी चहापानाचे निमंत्रण दिलेले होते. त्यानुसार फडणवीस तिथे गेले होते. खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिल्यावर फडणवीस यांनीही निमंत्रणावरून गेल्याचेच म्हटले होते.

Advertisement

त्यावर आता खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे की, फडणवीस हे यापूर्वीही घरी आले आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच ते घरी आले होते असे नाही. खडसे कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळेच, नाथाभाऊंचेही त्यांच्याशी बोलणे झाले. सर्व आमदार, पदाधिकारी, नेत्यांसोबत शेतात जाऊन पाहणी केल्यावर शेतकऱ्यांच्या शंका फडणवीसांनी सोडवण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply