Take a fresh look at your lifestyle.

राज ठाकरेंच्या आरोपांना वाघांनी दिले प्रत्युत्तर; म्हटले ‘हा तर खोडसाळपणाचा प्रकार..’

मुंबई : लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी भाजपचे आमदार आणि आताच्या महापालिकेच्या निवडणुकीचे जबाबदार नेते अतुल भातखळकर यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. उठसूट भाजपच्या मुद्द्यावर इतरांना लक्ष्य करणारे भातखळकर स्वतःच त्या पक्षात नाराज होते. तेच भाजप सोडणार होते असे ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यावर भाजपचे अवधूत वाघ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

Advertisement

ठाकरेंनी म्हटले होते की, भातखळकर हेच आमच्याकडे मनसेचे तिकीट मागायला आले होते. त्यावेळी मीच नितीन गडकरी यांना फोन लावून भातखळकर यांना भाजपमध्ये राहण्यास सांगितले. २००९ च्या निवडणुकीत भाजपचे आणखी एक लोखंडे हेही तिकीट मागायला आले होते. त्यांचीही गडकरी यांनी समजूत काढली होती. एकूणच यामुळे मुंबई भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे.

Advertisement

त्यावर अवधूत वाघ यांनी म्हटले आहे की, ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी केलेली टिपण्णी खोडसाळ आहे. त्या दरम्यान मी स्वतः मनसेचा राज्य उपाध्यक्ष होतो. त्यावेळी मला राजसाहेबांनी सांगितले होते की भाजपाने अतुलचे तिकीट कापले तेव्हा मी त्याला मनसेमधे ये, मी तुला तिकीट देतो असे सांगितले होते.

Advertisement

Avadhut Wagh अवधूत वाघ on Twitter: “‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात @BhatkhalkarA वर राज ठाकरे यांनी केलेली टिपण्णी खोडसाळ आहे. त्या दरम्यान मी स्वतः मनसेचा राज्य उपाध्यक्ष होतो. त्यावेळी मला राजसाहेबांनी सांगितले होते की भाजपाने अतुलचे तिकीट कापले तेव्हा मी त्याला मनसेमधे ये, मी तुला तिकीट देतो असे सांगितले होते.” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply