Take a fresh look at your lifestyle.

योगीराज्याने घेतलाय ‘तो’ महत्वाचा निर्णय; पहा करोना कालावधीत काय करणार आहे आरोग्य यंत्रणा..

दिल्ली : देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर ओसरत आहे. त्यामुळे राज्यांतील रुग्णसंख्या घटत आहे. लॉकडाउन आणि कठोर नियमांमुळे दुसरी लाटेवर बऱ्यापैकी नियंत्रणात आणण्यात यश मिळाले आहे. तरी देखील धोका अजून टळलेला नाही. भविष्यातील संकटाचा इशाराही काही तज्ज्ञ मंडळींनी आधीच दिला आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्येही सावध पावले टाकत आहेत. राज्यातील करोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेतले जात आहेत. राज्यात कोणत्या भागात काय परिस्थिती आहे. रुग्णसंख्या किती आहे, पॉझिटिव्हीटी दर किती आहे, लसीकरणाची काय परिस्थिती आहे, याचा नियमित आढावा घेण्यात येत आहे.

Advertisement

राज्यातील करोनाची आधिक सविस्तर माहिती घेण्यासाठी देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या उत्तर प्रदेश राज्याने महत्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या ४ जूनपासून राज्यातील सर्व ७५ जिल्ह्यांत सीरो सर्वे सुरू करण्यात येणार आहे. या सर्वेच्या माध्यमातून राज्यातील कोणत्या जिल्ह्यात करोनाचे संक्रमण किती फैलावले आहे, लोकसंख्येचा किती हिस्सा संक्रमित आहे याची माहिती मिळणार आहे. राज्य सरकारने या सर्वेचे नियोजन केले आहे. सर्वे पूर्ण केल्यानंतर अहवाल तयार करुन राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. याआधी करोनाच्या पहिल्या लाटेवेळी राज्यातील ११ जिल्ह्यांत सीरो सर्वे करण्यात आला होता. या जिल्ह्यांतील २२.१ टक्के लोकांमध्ये करोना विरोधात आवश्यक अँटीबॉडी असल्याचे दिसून आले. त्यानंतर यावेळी मात्र राज्यातील सर्वच जिल्ह्यात हा सर्वे करण्याचे सरकारचे नियोजन आहे. तसे पाहिले तर या राज्याची लोकसंख्या खूपच जास्त आहे. त्यामुळे या सर्वेचे नियोजन करताना ताण वाढला आहे. यावेळी सर्वच जिल्ह्यात सर्वे होणार आहे. त्यानुसार आवश्यक नियोजन करुन त्याचा आढावा घेण्यात येत आहे.

Advertisement

दरम्यान, या सर्वेद्वारे राज्यातील करोना आजाराबाबत आधिक स्पष्ट माहिती मिळणार आहे. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात किती प्रमाणात संक्रमण फैलावले आहे याची माहिती मिळणार आहे. त्यानुसार नियोजन करुन करोना नियंत्रणात आणण्यासाठी आधिक वेगाने आणि योग्य दिशेने प्रयत्न करणे शक्य होणार आहे. दुसऱ्या लाटेच्या काळात राज्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत होती. आता मात्र रुग्णसंख्या कमी होत आहे. करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पॉझिटिव्हिटी रेट कमी झाला आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. तरी देखील धोका टळलेला नाही. त्यामुळे याचा विचार करुन राज्य सरकार आवश्यक उपाययोजना करत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply