Take a fresh look at your lifestyle.

बापरे.. नोकरी आहे ना शाबित..? पहा ‘हेही’ संकट आहे की जोमावर..!

मुंबई : करोना विषाणूच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट जास्त घातक ठरली आहे. या लाटेने देशात हाहाकार उडाला. देशाच्या अर्थव्यवस्थेस जबर फटका बसला. गरीबी वाढली, सर्वात महत्वाचे म्हणजे लाखो लोकांचे रोजगार गेले. बेरोजगारीचा हा आलेख वाढतच चालला आहे. करोना देशाात दाखल झाल्यापासून देश अनेक संकटांतून जात आहे. करोनाला तर आटोक्यात आणायचेच आहे. त्याच बरोबर या विषाणूने आज ज्या काही समस्या निर्माण केल्या आहेत, त्याही दूर करायच्या आहेत. मात्र, तसे होताना दिसत नाही. करोनामुळे अनेकांचे रोजगार गेले, हे खरे आहे. आता तर हा आकडा वाढतच चाालला आहे. तुम्हाला ऐकून कदाचित विश्वास बसणार नाही पण, आजमितीस देशातील एक कोटींपेक्षा जास्त लोकांना आपले रोजगार गमवावे लागले आहेत. नुसतेच रोजगारच नाही तर देशातील तब्बल ९७ टक्के कुटुंबांचे उत्पन्न देखील घटले आहे.

Advertisement

सेंटर फॉर मॉनिटरींग इंडियन इकॉनॉमीचे (सीएमआयई) मुख्य अधिकारी महेश व्यास यांनी याबाबत माहिती दिली. करोनाच्या संकटात देशात बेरोजगारीचा दर वाढत आहे. आता जून महिना सुरू झाला आहे. याआधी मे महिन्यातही दुसऱ्या लाटेचा प्रकोप सुरू होता. त्यामुळे या महिन्यात तर मागील एप्रिल महिन्याच्या तुलनेत बेरोजगारीचा दर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. एप्रिल महिन्यात देशात बेरोजगारीचा दर ८ टक्के होता मात्र, मे महिन्यात हा दर १२ टक्के झाला आहे. म्हणजेच, अजूनही लोकांचे रोजगार कमी होत आहेत. ज्या लोकांचे रोजगार गेले आहेत, त्यांना आता दुसरा रोजगारही लवकर मिळत नाही. कारण, करोनाचा धोका अजून कायम असल्याने कंपन्यांनी नोकर भरतीचा विचार केलेला नाही. असंघटीत क्षेत्रात रोजगार लवकर मिळतो त्यातुलनेत संघटीत क्षेत्रात रोजगार सहजासहजी मिळत नाही.

Advertisement

मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी बेरोजगारीचा दर मात्र कमी आहे. मागील वर्षात देशव्यापी लॉकडाऊन होता. या काळात अनेक जणांचे रोजगार गेले. त्यामुळे बेरोजगारीचा दर २३.५ टक्के इतका वाढला होता. एप्रिल महिन्यात देशातील १.७५ लाख कुटुंबांचा सर्वे करण्यात आला. यामध्ये असे दिसून आले की मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी कुटुंबांचे मासिक उत्पन्न घटले आहे, असे त्यांनी सांगितले. देशात आज अशा अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याची जाणीव सरकारला आहे. या समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न होत नाहीत, असेही नाही. मात्र, या गोष्टींचा विचार गांभीर्याने होत नाही. त्यामुळे आधिक ठोस प्रयत्न सुद्धा होत नाहीत. त्यामुळे या समस्या कमी होण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply