Take a fresh look at your lifestyle.

चीनचा विषय डोकेदुखीचाच झाली की..; ..तर नवीन महामारी येण्याचा धोका आहेच की..

वॉशिंग्टन : करोना नेमका कुठून आला, या प्रश्नाचे उत्तर अजूनही जगाला मिळालेले नाही. या मुद्द्यावर चीन आणि अमेरिकेत तणाव निर्माण झाला आहे. कारण, अमेरिकेने करोना विषाणूच्या उत्पत्तीच्या ठिकाणाचा शोध घेण्याचे आदेश गुप्तचर यंत्रणांना दिले आहेत. त्यानंतर वैज्ञानिकांना असे काही पुरावे मिळाले आहेत की ज्याद्वारे करोना विषाणू चीनच्या वुहान प्रयोगशाळेतूनच जगभरात पसरला, हे सिद्ध करता येईल, असा दावा केला जात आहे. कितीही दावे केले जात असले तरी या प्रश्नाचे ठोस उत्तर आजही मिळालेले नाही. त्यानंतर आता अमेरिकेच्या तज्ज्ञांनी करोना विषाणूबाबत नवा दावा केला आहे.

Advertisement

अमेरिकेच्या फाइजर बोर्डाचे सदस्य स्कॉट गोटलिब यांनी सांगितले, की करोना विषाणू वुहान प्रयोगशाळेतून लीक झाल्याचा दावा केला जात असून याबाबतच आता आणखी सूचना मिळत आहेत. दुसरीकडे मात्र हा दावा खोटा असल्याचे सिद्ध करणारा एकही पुरावा चीनने दिलेला नाही. तसेच वन्यप्राण्यांद्वारे हा विषाणू माणसांत पसरल्याचेही कोणताच पुरावा मिळालेला नाही. टेक्सास चिल्ड्रेन हॉस्पिटस सेंटर फॉर वैक्सिन डेव्हलपमेंटचे सहाय्यक निदेशक पीटर होत्ज यांनी सांगितले, की करोना व्हायरसच्या उत्पत्तीच्या ठिकाण अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे भविष्यात नवीन महामारी येण्याचा धोका राहणार आहे. जर आपण ‘कोविड १९’ विषाणूची उत्पत्ती कशी झाली हे जर नीट समजून घेतले नाही तर भविष्यात ‘कोविड २६’, ‘कोविड ३२’ सुद्धा येऊ शकतात, असा इशारा त्यांनी दिला.

Advertisement

दरम्यान, या मुद्द्यावर अमेरिका आधिक आक्रमक आहे. हा विषाणू कुठून आला, याचा शोध घेण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला जात आहे. अन्य देशही आता अमेरिकेचे समर्थन करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेस या प्रकाराची आधिक चौकशी करण्याची गरज वाटत आहे. त्यामुळे आता चीनवर दबाव वाढत चालला आहे. याआधी चीन आणि जागतिक आरोग्य संघटनेने संयुक्त तपासणी केली होती. संघटनेच्या तज्ज्ञांनी वुहान प्रयोगशाळेचा दौराही केला होता. मात्र, तपासणी दरम्यान अनेक महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे संघटनेच्या तपासणी अहवालावर कोणताही देश विश्वास ठेवण्यास तयार नाही. आता मात्र चीन काय करणार हे महत्वाचे ठरणार आहे. चीन पुन्हा तपासणी करण्यास परवानगी देणार का , हा मोठा प्रश्न आहे. चीनचा स्वभाव पाहता या मुद्द्यावर आधिक चौकशी करण्यास चीन तयार होईल, याची शक्यता कमीच  वाटते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply