Take a fresh look at your lifestyle.

राहुल गांधींनी मोदींना विचारले ‘ते’ महत्वाचे 3 प्रश्न; पहा काय म्हणणे आहे त्यांचे

दिल्ली : करोना पाठोपाठ देशात ब्लॅक फंगसचा आजार थैमान घालत आहे. पाहता पाहता या महामारीने २६ राज्यांना विळखा घातला आहे. या २६ राज्यात जवळपास वीस हजार रुग्ण सापडले आहेत. या आजाराचा धोका ओळखून अनेक राज्यांना ब्लॅक फंगसला महामारी घोषित केले आहे. करोनानंतर हा आजार जास्त घातक ठरत आहे. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी सरकारच्या नियोजनावर मात्र आता आरोप होऊ लागले आहेत. करोनाच्या मुद्द्यावर सरकारला घेरणाऱ्या काँग्रेसने आता या आजारावरही सरकारवर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारला तीन प्रश्न केले आहेत. या प्रश्नांचे उत्तर सरकारने द्यावे, अशी मागणीही केली आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे, की ‘ब्लॅक फंगसवरील औषधांची कमतरता दूर करण्यासाठी काय केले जात आहे, रुग्णांना औषध उपलब्ध होण्यासाठी काय प्रक्रिया आहे, रुग्णांवर उपचार करण्याऐवजी मोदी सरकार नागरिकांना औपचारिकतेत का अडकवत आहे.’ राहुल गांधी यांनी करोनाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला अनेक सूचना दिल्या होत्या. हा आजार आटोक्यात आणण्यासाठी काय करता येईल, हे सांगितले होते. वेळोवेळी इशारेही दिले होते. मात्र, सरकारने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर आता ब्लॅक फंगसच्या आजाराबाबतही काही महत्वाचे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत. या महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत, असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, केंद्र सरकारचा त्यांच्या बाबतीतला आतापर्यंतचा अनुभव पाहता या प्रश्नांची उत्तरे मिळतील याची शक्यता कमीच आहे. याआधीही असे बऱ्याचदा घडले आहे.

Advertisement

दरम्यान, देशात या आजाराचे रुग्ण वाढत आहे. करोनातून बरे झालेल्यांना जास्त धोका आहे. कर्नाटक राज्यात रविवारी एकाच दिवसात १२०० रुग्ण सापडले होते. देशात एकूण २६ राज्यात हा आजार पसरला आहे. केंद्र सरकारही या परिस्थितीवर लक्ष देत आहे. तसेच आवश्यक औषधांची कमतरता होऊ नये यासाठी नियोजन केले जात आहे. राज्यांनी या आजारास महामारी घोषित केले आहे. त्यामुळे रुग्णांची माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. केंद्र सरकारनेही काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारे कार्यवाही करत आहेत. पावसाळ्याच्या दिवसात करोनाचा धोका वाढणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसचाही धोका राहणार आहे. या गोष्टी विचारात घेऊन राज्ये नियोजन करत आहेत. त्यामुळेच करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी राज्यांनी अजूनही लॉकडाऊन पूर्णपणे मागे घेतलेले नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply