Take a fresh look at your lifestyle.

कैदीही म्हणतायेत, ‘गड्या आपला जेलच बरा..’; पहा कशामुळे बाहेर येऊशी वाटेना कैद्यांना..!

मुंबई : कोणालाही जेलमध्ये जायला अजिबात आवडत नाहीत. मग भले तो भला सामान्य नागरिक असोत, की अट्टल दरोडेखोर वा खुनी गुन्हेगारही. मात्र, आता करोनाच्या निमित्ताने उलटेच पाहायला मिळत आहे. सध्या जेलमध्ये अडकून पडलेली मंडळी कारागृहातून बाहेर न येण्यासाठी आटापिटा करीत असल्याचे चित्र महाराष्ट्र राज्याची पोलीस व न्याययंत्रणा पाहत आहे.

Advertisement

करोनाच्या दुसऱ्या लाटेत केंद्र आणि राज्य सरकारच्या कृपेने सुरू असलेले मृत्यूचे तांडव पाहून अनेकांनी तिसऱ्या लाटेचा धसका घेतला आहे. त्यात कैदीही आहेत. कैद्यांनी इमरजेंसी पॅरोलसाठी आवेदन करण्यास नकार देऊन तात्पुरते रीलीझ (पॅरोल) नको असल्याचे सूचित केले आहे. अगदी एक दिवस का होईना बाहेर पडून जगाला उघड्या डोळ्यांनी बघण्याची अनेक कैद्यांची इच्छा असते. मात्र, आता तेही अनेकांना नकोसे वाटत आहे. त्याचे मुद्दे असे :

Advertisement
  • लॉकडाऊन दरम्यान ते पोट कसे भरणार याची भिती
  • आर्थिक संकटात कुटूंबियांवर ओझे बनण्याची भीती
  • कुटूंबाने गुन्हेगारीच्या स्वरूपामुळे स्वीकारले नाही
  • कोविडच्या भीतीने त्यांच्या खेड्यात किंवा घरात प्रवेश मिळाला नाही
  • तात्पुरत्या रिलीजऐवजी लवकरच संपूर्ण रिलीजची मागणी केली जात आहे

सुप्रीम कोर्टाने आपत्कालीन पॅरोल आणि तात्पुरत्या जामिनावर महाराष्ट्रातील 46 तुरूंगातील 10,000 हून अधिक कैद्यांची सुटका करून तुरूंगात होणारी गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, आता कोणीही असा अर्जच करीत नसल्याचे चित्र आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply