Take a fresh look at your lifestyle.

PF बाबतचा ‘तो’ महत्त्वपूर्ण बदल आहे का माहिती? नसेल माहिती तर वाचा की झटपट..

दिल्ली : करोनाने देशातील लाखो लोक बेरोजगार झाले. काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे पगार कमी केले. उद्योग-व्यवसाय बंद पडले. त्यामुळे नवीन रोजगार मिळण्याचा मार्ग आधिकच खडतर झाला आहे. लॉकडाउन आणि कठोर निर्बंधांमुळे घराबाहेर पडणे कठीण झाले. त्यामुळे नागरिकांना आता आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने आता भविष्य निर्वाह निधी (पीएफ) बाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

भविष्य निर्वाह निधी संघटनेने सभासदांना दुसऱ्यांदा पीएफमधील शिल्लक रकमेतून आगाऊ रक्कम काढण्यास परवानगी दिली आहे. याआधी पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत मार्च २०२० मध्ये असा निर्णय घेण्यात आला होता. केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने याबाबत आधिक माहिती देताना सांगितले, की मागील ज्या सभासदांनी त्यांच्या पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढली होती, त्या सभासदांना यंदाही त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेतून पैसे काढता येतील. या निर्णयाने सध्याच्या करोना महामारीच्या काळात सभासदांना दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने दुसऱ्यांदा पीएफ खात्यातून पैसे काढण्यास परवानगी दिली आहे. देशात आतापर्यंत ७६.३१ लाख सभासदांनी त्यांच्या पीएफ खात्यातून जवळपास १६,६९८.१५ कोटी रुपये आगाऊ रक्कम काढली आहे. आता पुन्हा पैसे काढण्यास परवानगी दिली आहे. सभासदांना लवकरात लवकर पैसे मिळावे, याचे नियोजन केले आहे. आगाऊ रकमेसाठी अर्ज  केल्यानंतर साधारण तीन दिवसात पैसे संबंधित सभासदाच्या खात्यात जमा होतील, असे नियोजन केले आहे.

Advertisement

करोना संकटात लोकांना पैशांची चणचण जाणवत आहे. रोजगार मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. अशा वेळी मग सेव्हिंग्जला आधार घ्यावा लागत आहे. या काळात अनेक जणांनी आपले बचत केलेले पैसे खात्यातून काढले आहेत. दुसऱ्या लाटेतही अशीच परिस्थिती आहे. राज्यांनी केलेल्या लॉकडाउमुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. रोजगाराचा प्रश्नही कायम आहे. काही कंपन्या भरती करत असल्या तरी त्याचे प्रमाण कमीच आहे. आता तर काही राज्यांनी लॉकडाउन आणखी वाढवला आहे. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. या परिस्थितीचा विचार करुन सरकारने पुन्हा सभासदांना पीएफ खात्यातून आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी दिली आहे. दरम्यान, देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत असला तरी धोका अजूनही कायम आहे. त्यातच आता ब्लॅक फंगसचा आजार थैमान घालत आहे. करोनातून बरे झाल्यानंतर अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे आरोग्यावरील खर्च वाढला आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply