Take a fresh look at your lifestyle.

चीनने ठेंगा दाखवूनही पाकिस्तानला अच्छे दिन; कारण ‘त्या’ भारतमित्राने केला मदतीचा हात, उलट भारतालाच बसणार झटका?

दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी असलेल्या पाकिस्तानला अडचणीच्या काळात मदत करण्यास कुणीही तयार नाही. देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. कर्जाचा डोंगर झाला आहे. महागाईचाही मार आहेच. म्हणून तर देशाचे राज्यकर्ते कर्ज मिळवण्यासाठी दुसऱ्या देशांचे दौरे करत आहेत. आता तर अशी वेळ येऊन ठेपली आहे, की आधीचे कर्ज चुकते करण्यासाठी नवीन कर्ज घ्यावे लागत आहे. या संकटाच्या काळात मित्र देश चीननेही झटका दिला आहे. चीनने पाकिस्तानला दिलेल्या कर्जाचे पुनर्गठण करण्यास स्पष्ट नकार दिला आहे. चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला जबरदस्त झटका बसला आहे. या घडामोडींमुळे पाकिस्तानची डोकेदुखी तर वाढली आहेच. पण, त्यानंतर आता भारताचे टेन्शन वाढवणारी बातमी सुद्धा आली आहे.

Advertisement

भारताचा मित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रशियाने असे काही केले आहे, त्यामुळे भारताची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे. रशियातील कासूर आणि पाकिस्तानातील कराची शहरापर्यंत एक पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. यासाठी दोन्ही देशां दरम्यान करार झाला आहे. या करारवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सही केल्याची माहिती मिळाली आहे. जागतिक राजकारण आता पहिल्या सारखे राहिलेले नाही. येथे प्रत्येक देश स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करतो. कुणाही कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नाही. कुरघोडी करण्याचेही प्रकार होतातच. तरी देखील फायदा असेल तर काही वेळेस या गोष्टी बाजूला ठेवल्या जातात. त्याचाच प्रत्यत आता येत आहे.

Advertisement

भारताचा मोठा शत्रू म्हणजे पाकिस्तान. आताच्या मोदी सरकारच्या काळात दोन्ही देशात तणाव जास्त वाढला आहे. दोन्ही देशांतील व्यापार जवळपास बंदच आहे. त्यातही भारत विरोध म्हणून चीन आणि पाकिस्तान यांच्यात मैत्री वाढत आहे. त्यातच आता काही दिवसांपासून रशिया आणि पाकिस्तान यांच्यातही संबंध सुधारत आहे. म्हणून तर रशियाने येथे अब्जावधी रुपये गुंतवणूक करण्याचा विचार असल्याचेही याआधी स्पष्ट केले होते. आता तर पाइपलाइन योजनेचा करारही करुन टाकला आहे. या योजनेसाठी अडीच अब्ज डॉलर्स खर्च येणार आहे. या पाइपलाइनचे काम पूर्ण झाल्यानंतर रशियातून वायू निर्यात केला जाणार आहे.

Advertisement

या घडामोडींचा भारतावर परिणाम होणार आहे. चीनचेही याकडे लक्ष आहेच. कारण, काही दिवसांपासून चीन आणि रशिया यांनी मागील वाद विसरुन दोन्ही देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या दोन्ही देशांची वाढत असलेली मैत्री भविष्यात भारतासाठी अडचणीची ठरू शकते.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply