Take a fresh look at your lifestyle.

हे भारीय की.. मग शरीरात इम्युन सेल्स अँटिबॉडीज असतात आयुष्यभर..!

पुणे : करोना झाल्यावर किंवा करोनाची लस घेतल्यावर नेमक्या किती दिवस, महिने आणि वर्षे अँटिबॉडीज शरीरात राहतात यावर सध्या संशोधन चालू आहे. त्यातच एक दिलासादायक अशी बातमी आलेली आहे. संशोधकांनी यावर काढलेला निष्कर्ष जर योग्यच असेल तर अशा व्यक्तींना मग कोविड १९ नावाचा आजार पुन्हा बधाण्याची शक्यताच नाही.

Advertisement

होय, काहींच्या शरीरात इम्युन सेल्स अँटिबॉडीज असू शकतात, असेच नेचर नावाच्या वैज्ञानिक संशोधनाच्या अहवालास प्रसिद्धी देणाऱ्या मासिकात प्रसिद्ध झालेले आहे. अमेरिकेच्या वॉशिंग्टन विद्यापीठातील स्कूल ऑफ मेडिसिनच्या एका संशोधनात असे निष्कर्ष नोंदवण्यात आलेले आहेत. कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्या ७७ रुग्णांवर सलग दीड वर्षे झालेल्या संशोधनातून हे महत्वाचे आणि दिलासादायक वाटणारे असे अहवाल प्राप्त झालेले आहेत. त्यातील मुद्दे असे :

Advertisement
  • कोविडची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण बरे झाल्यानंतरही त्यांच्या शरीरात इम्यून सेल तहहयात कायम राहतात.
  • या इम्युन सेल्स कोरोना विषाणूसाठीच्या अँटिबॉडीज शरीरात सोडत राहतात.
  • कोरोनाची कमी लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये कायमस्वरुपी अँटिबॉडीजचे संरक्षण तयार झालेले असते.
  • अशा रुग्णांना कोविड १९ आजार होण्याची शक्यता खूपच कमी असते.

एकूणच असे जर झाले तर अनेकांना या रोगाचे संरक्षण कवच आपोआप मिळणार आहे. यावर पुढे काय संशोधन होते आणि त्याचे काय निष्कर्ष येतात, त्यावरच अंतिम उत्तर ठरणार आहे. तोपर्यंत सगळ्यांना काळजी घ्यावीच लागणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply