Take a fresh look at your lifestyle.

लॉकडाउन हा अंतिम उपाय नाही, तर ‘ती’ आहे महत्वाची उपाययोजना; पहा नेमके काय म्हटलेय स्टालिन यांनी

चेन्नई : करोनाला रोखण्यासाठी देशातील राज्यांनी लॉकडाउन केला आहे. आता दुसरी लाट ओसरत असली तरी लॉकडाउन मागे घेतला नाही. या उलट निर्बंधात काही सवलती देऊन लॉकडाउन पुन्हा वाढवला आहे. यामागेही काही कारणे आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका, लॉकडाउन काढला तर लोक नियम पाळतील का, लॉकडाउन हटवला तर गर्दी होऊन रुग्णवाढीचा धोका, अशा कारणांमुळे लॉकडाउनबाबत सावध पावले टाकली जात आहेत. दुसरीकडे मात्र, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन यांनी वेगळेच मत व्यक्त केले आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले आहे, की करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी फार काळ लॉकडाउन वाढवता येणार नाही. मात्र, नागरिकांनी समर्थन आणि सहयोग दिल्यासच या महामारीचा समूळ नायनाट करता येणे शक्य आहे. लॉकडाउन सतत वाढवता येऊ शकत नाही, आता यावर पूर्णविराम द्यायला हवा. करोनाचा प्रसार रोखणे आता केवळ लोकांच्याच हातात आहे. त्यांनी जर सरकारला पूर्ण सहयोग दिला, आणि आपली जबाबदारी ओळखून करोना प्रतिबंधक नियमांचे पालन केले तर या महामारीवर विजय मिळवता येऊ शकतो. त्यांनी पुढे असेही म्हटले, की काही ठिकाणी लोकांनी नियमांचे पालन केले नाही. त्यामुळेच लॉकडाऊनचा पूर्ण परिणाम दिसून आला नाही. करोनाच्या दुसऱ्या लाटेने राज्याची अर्थव्यवस्था आणि आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. लोकांनी आता तरी समजून घेतले पाहिजे, की करोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन हा एक पर्याय आहे.

Advertisement

लॉकडाउनमुळे करोना रोखण्यात यश आल्याचे मात्र त्यांनी मान्य केले. या मुद्द्यावर स्टालिन म्हणाले, की लॉकडाउन असल्यामुळे राज्यात करोना आटोक्यात आला. एका वेळी चेन्नई शहरात रोज सात हजार रुग्ण सापडत होते. आताही संख्या दोन हजारांवर आली आहे. पुढील काही दिवसात रुग्णसंख्या आणखी कमी होणार आहे. दरम्यान, देशात दुसरी लाट आता वेगाने ओसरत आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. पॉझिटिव्हीटी दरही कमी झाला आहे. तरी देखील करोनाचा धोका अजून टळलेला नाही. आता तर तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यांकडून नियोजन सुरू आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply