Take a fresh look at your lifestyle.

धडकी भरवणारी बातमी : एकाची दिवशी सापडले ब्लॅक फंगसचे तब्बल १२०० रुग्ण; काळजी घ्या रे..

बंगळुरू : करोना महामारीचा मार सहन करत असलेल्या कर्नाटक राज्यावर आता मोठेच संकट कोसळले आहे. म्युकरमायकोसिस (ब्लॅक फंगस) या आजाराने राज्यात थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. तसे पाहिले तर ब्लॅक फंगस या आजाराचे रुग्ण देशभरात आढळून येत आहे. मात्र, कर्नाटकमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव जास्तच वाढला आहे. या आजाराने राज्य सरकारलाही काळजीत टाकले आहे.

Advertisement

कर्नाटक राज्यात रविवारी एकाच दिवसात ब्लॅक फंगसचे तब्बल १ हजार २५० रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. या आजाराचा प्रादुर्भाव किती वेगाने वाढत आहे, हे यावरुन स्पष्ट होत आहे. करोनातून बरे झालेल्या रुग्णांना या आजाराचा जास्त धोका आहे. करोना प्रसाराच्या बाबतीतही राज्य दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे आता राज्य सरकारला या दोन्ही आजारांचा सामना करावा लागत आहे. रविवारी ब्लॅक फंगसचे १ हजार २५० नवीन रुग्ण सापडले तर सध्या १ हजर १९३ रुग्णांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती राज्य सरकारने दिली.

Advertisement

ब्लॅक फंगसनंतर व्हाइट फंगस आणि येलो फंगसचेही रुग्ण सापडत आहेत. मात्र, सध्या ब्लॅक फंगसच्या रुग्णांत मोठी वाढ झाली आहे. या आजाराच धोका पाहता अनेक राज्यांनी या आजारास महामारी म्हणून घोषित केले आहे.  केंद्र सरकारनेही याबाबत राज्यांना काही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार राज्य सरकारे कार्यवाही करत आहेत. हा आजार जास्त घातक असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहे. या आजारावरील औषधाचे उत्पादन वाढवण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने नियोजन केले आहे, त्यामुळे औषधांची कमतरता जाणवणार नाही, यासाठी प्रयत्न होत आहेत.

Advertisement

दुसरीकडे कर्नाटकमध्ये करोनाचे रुग्णही मोठ्या संख्येने आढळत आहेत. मागील २४ तासात राज्यात करोनाचे २० हजार ३७८ रुग्ण आढळले आहेत. करोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यातील लॉकडाऊनही वाढवण्यात आला आहे. तरी सुद्धा रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. कर्नाटकप्रमाणेच अन्य काही राज्यांनी लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी होत आहे. त्यामुळे रुग्णसंख्या कमी होत आहे. रिकवरी वाढला आहे आणि पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. या परिस्थितीचा विचार करुन काही सवलतीही देण्यात येत आहेत. यानंतर तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पावसाळ्याच्या दिवसात करोनाचा प्रसार आणखी वाढण्याची भिती आहे, त्यामुळे भविष्यातील धोका विचारात घेऊन राज्य सरकार निर्णय घेत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply