Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांच्या खिशात हात..! साखर कारखान्यांच्या शेअरच्या रकमेत सरकारकडून वाढ, पहा शेतकऱ्यांवर किती बोजा पडणार..?

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्याची (Sugar Factory) अवस्था म्हणजे फाटक्यात पाय, अशी झाली आहे. अनेक कारखाने कर्जाच्या खाईत बुडाले आहेत. या कारखान्याना उभं करण्यासाठी राज्य सरकारने शेतकरी सभासदांच्याच खिशात हात घातला आहे. त्यातून कारखाने किती उभी राहतात, याबद्दल मात्र शंकाच उपस्थित होत आहेत. कारण, सरकारने याआधीही सहकारी साखर कारखान्यांना कोट्यवधी रुपयांची मदत केली. मात्र, ही मदत पाण्यात गेली आहे.

Advertisement

.. तर आता तुम्हाला साखर कारखान्याचे सभासदत्व टिकवायचे असेल, तर 5 हजार रुपये आणखी भरावे लागणार आहेत. कारण, सरकारने आता सहकारी साखर कारखान्यांच्या सभासद भागाच्या दर्शनी मूल्यांची रक्कम 10 हजारावरून 15 हजार इतकी केली आहे. त्यामुळे सभासदांना प्रत्येक शेअरमागे (Share) 5 हजारांचा फटका बसणार आहे.

Advertisement

राज्यात सध्या 95 सहकारी साखर कारखाने असून, त्यांची सभासद संख्या 22 लाख इतकी आहे. सहकारी साखर कारखान्याच्या शेअरची रक्कम आधी 10 हजार रुपये होती. आता ती 15 हजार रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे सभासदाला आपलं सभासदत्व टिकवण्यासाठी आता पुन्हा एकदा 5 हजार रुपये भरावे लागणार आहेत. त्यातून 3300 कोटी रुपये जमा होणार आहेत.

Advertisement

दरम्यान, सरकारच्या या निर्णयाला शेतकरी संघटनांनी विरोध केला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे खासगीकरण वाढेल, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. कोरोना काळात शेतकऱ्यांना आधीच आर्थिक फटका बसला आहे. शेतमालाला भाव नाही आणि त्यात अजून त्यांच्या माथी हा शेअरचा बोजा टाकल्याने शेतकरी सरकारच्या निर्णयाचा विरोध करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply