Take a fresh look at your lifestyle.

युरीयाची चिंता मिटली.. ही एकच बाटली करील एका गोणीचे काम, वाचा तर खरं, हे काय नवीन आलेय..?

नवी दिल्ली : मॉन्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागले आहेत. बी-बियाणे, खते औषधे खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे. मात्र, दरवर्षी शेतकऱ्यांना अडचण येते रासायनिक खतांची. त्यातही युरियासाठी शेतकऱ्यांना दरवर्षी धावाधाव करावी लागते.

Advertisement

मात्र, यंदा शेतकऱ्यांना युरीयाची टंचाई जाणवणार नाही.. म्हणजे मोठ्या प्रमाणात युरीया उपलब्ध आहे, असे नाही.. तर यंदा शेतकऱ्यांना ‘नॅनो यूरिया लिक्विड’ उपलब्ध झाले आहे. काय आहे हे ‘नॅनो युरिया लिक्विड’.. ते पिकांना कसे द्यायचे, त्याचा पिकांना फायदा होईल का, त्याची किंमत किती, असे प्रश्न तुम्हाला पडले असतील, तर ही बातमी वाचा..

Advertisement

‘इंडियन फार्मर फर्टिलायजर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड’ अर्थात ‘इफ्को’ (Iffco) यांनी हे ‘नॅनो यूरिया लिक्विड’ (nano liquid urea) तयार केले आहे. यूरियाची मागणी कमी करण्यासाठी हे तयार करण्यात आले आहे. हे खत ‘लिक्विड’ स्वरुपात असेल. मात्र, ‘नॅनो यूरिया’च्या 500 मिलीमध्येच यूरीयाच्या 50 किलोच्या बॅगइतकी पोषणतत्वे मिळतील.

Advertisement

स्वदेशी तंत्रज्ञानाच्या आधारे हे खत तयार करण्यात आले आहे. कलोल येथील नॅनो जैवतंत्रज्ञान संशोधन संस्थेत या खताची निर्मिती करण्यात आली आहे. ‘नॅनो यूरिया’ची 500 मिलीची बाटली फक्त 240 रुपयांना उपलब्ध होणार आहे. म्हणजेच सामान्य यूरियाच्या 10 टक्के किमतीत शेतकऱ्यांना नॅनो यूरिया मिळेल.

Advertisement

राष्ट्रीय कृषी संशोधन प्रणाली अंतर्गत 20 आयसीएआर, देशातील कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रांमध्ये 43 पिकांवर या खताची चाचणी करण्यात आली. नंतर संपूर्ण भारतात खताची परिणामकारकता तपासण्यासाठी 94 पिकावर चाचणी करण्यात आली. नॅनो यूरियामुळे पिकांमध्ये 8 टक्के वाढ नोंदवण्यात आली.

Advertisement

‘आत्मनिर्भर भारत, आत्मनिर्भर शेती’ अभियानात या खताची निर्मिती करण्यात आली आहे. इफ्को नॅनो यूरिया पिकांवर प्रभावी ठरले आहे. तसेच जमिनीतील पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठीही फायदा होणार आहे. ग्लोबल वॉर्मिंग कमी करण्यासाठी नॅनो यूरियाचा प्रभावी ठरणार आहे. शेतकऱ्यांनी नॅनो यूरियाचा वापर केल्यास मातीची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. नॅनो यूरियामुळे पिकांची गुणवत्ता वाढवण्यासा देखील मदत होणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply