Take a fresh look at your lifestyle.

अर्र.. करोनाचा झटका लैच बेक्कार; ‘त्या’ सेक्टरला बसलाय तब्बल ५१ टक्के इतका झटका..!

मुंबई : करोना देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले. देशाच्या विकासात महत्वाचे योगदान देणाऱ्या उद्योगांचे तर कंबरडेच मोडले आहे. त्यामुळे देशाच्या आर्थिक घोडदौडीसही ब्रेक लागला आहे. बेरोजगारी तर वाढली आहेच. त्यातच आता मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्रालाही झटका बसला आहे. लॉकडाउन आणि अन्य कारणांनी मागणी घटल्याने उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे.

Advertisement

देशातील मॅन्यूफॅक्चरिंग क्षेत्राबाबत एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. करोना काळातील लॉकडाऊन आणि कठोर निर्बंधांचा या क्षेत्रावर विपरीत परिणाम झाला आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे मागणी घटली आहे. त्यामुळे कंपन्यांना मिळणाऱ्या ऑर्डर कमी झाल्या आहेत. मार्केट इंडिया मॅन्युफॅक्चरिंग पर्जेसिंग मॅनेजर इंडेक्स (पीएमआय) मध्ये मे महिन्यात घट होऊन ५०.८ वर आला आहे. एप्रिल महिन्यात हा इंडेक्स ५५.५ होता. विशेष म्हणजे, मागील वर्षातील जुलै महिन्यानंतर मॅन्यूफॅक्चरिंग ग्रोथ सर्वात कमी आहे. आएचएस मार्केटचे निदेशक पॉलिएना डी. लीमा यांनी सांगितले, की मे महिन्यात विक्री, उत्पादन निर्देशांक घटले आहेत. परिणामी देशातील उत्पादन क्षेत्राचा विकास दर मागील दहा महिन्यात सर्वात कमी राहिला आहे.

Advertisement

कारखान्यांतील उत्पादनाचा परिणाम अन्य क्षेत्रांवरही होतो. व्यवसायातील गुंतवणूक आणि कर्मचाऱ्यांवरही याचा परिणाम होतो. नुकत्याच जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या जीडीपीत १.६ टक्के वाढ नोंदवण्यात आली. मात्र, २०२०-२१ या आर्थिक वर्षात जीडीपी ७.३ टक्के होती. मागील चाळीस वर्षांचा विचार केला तर देशाच्या जीडीपीत यावेळी सर्वाधिक घट झाली आहे. देशात शहरीकरण वेगाने होत आहे. विदेशी गुंतवणूक वाढत आहे. रोज नवीन प्रकल्प उभे राहत आहे. त्यामुळे औद्योगिकीकरण वाढले आहे. गेल्या काही दशकात भारताने अनेक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र, करोनाने गणितच बिघडून टाकले आहे. करोना आला खरा.. त्यापाठोपाठ बेरोजगारी, गरीबी, व्यापाराचे नुकसान, उद्योग-व्यवसायांना टाळे, रियल इस्टेटचे नुकसान.. अशा अनेक संकटांना घेऊन आला. या संकटांमुळे आज देशासमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्या दूर करण्यासाठी काही वेळ जाणार आहे. दरम्यान, देशात आता करोनाची दुसरी लाट कमी होत आहे. रुग्णसंख्या कमी झाली आहे. त्यामुळे निर्बंध कमी केले जात आहेत. काही राज्यांनी अद्याप फारसे निर्बंध कमी केलेले नाहीत. करोनाची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply