Take a fresh look at your lifestyle.

दिलासादायक बातमी : मोदी सरकारने लसटंचाईवर केलेय ‘असे’ नियोजन; पहा काय म्हटलेय सरकारने

दिल्ली : करोना लसींची टंचाई कधी हटणार, बंद असलेले लसीकरण केंद्र पुन्हा कधी सुरू होणार, सर्वांना लस कधी मिळणार, असे प्रश्न प्रत्येकालाच पडत आहेत. ते सहाजिकच आहे म्हणा. कारण, देशात सध्या करोना लसींबाबत जो गदारोळ सुरू आहे, तो पाहता कुणालाही प्रश्न पडणारच. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्याची इच्छा नागरिकांना आहे. सरकारनेही आता या प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे.

Advertisement

देशात लसींची टंचाई निर्माण झाली आहे. ही समस्या दूर करण्यासाठी लसींचे नियोजन करण्यात येत आहे. जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस दररोज देशातील एक कोटी नागरिकांचे लसीकरण करता येईल इतक्या लसी उपलब्ध असतील, असा दावा केंद्र सरकारने केला आहे. या वर्षातील डिसेंबर पर्यंत देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण होईल, असे अपेक्षित आहे. देशात लसीकरण आणि लसींची कमतरता या मुद्द्यांवर गदारोळ सुरू आहे. केंद्र सरकार लसीकरणाचे नियोजन करत आहे. राज्यांना लसींचा पुरवठा केला जात आहे. मात्र, केंद्र सरकार पुरेशा प्रमाणात लसी देत नाही. लसीकरणाचे नियोजन फसले आहे. लसी नसल्याने लसीकरण केंद्रे बंद ठेवावी लागत आहेत. लस खरेदी करण्याची जबाबदारी केंद्राची आहे. राज्यांची नाही, असेही राज्ये म्हणत आहेत. या मुद्द्यावर केंद्र आणि राज्य सरकारांत वाद होत आहेत.

Advertisement

आज राज्यांतील परिस्थिती पाहिली तर राज्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे दिसत आहे. अनेक लसीकरण केंद्रात लसी नसल्याने लसीकरण होत नाही. नागरिकांनाही नाईलाजाने पुन्हा माघारी यावे लागत आहे. या अडचणींमुळे देशात लसीकरणाचा वेग खूपच कमी झाला आहे. लसीकरणाचा वेग वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. ही गोष्ट आता केंद्र सरकारच्या लक्षात आली आहे. त्यामुळेच लसींची टंचाई दूर करण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे आता केंद्र सरकारही म्हणत आहे. जास्तीत जास्त लसी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले. काही विदेशी कंपन्यांच्या लसींना मंजुरी दिली आहे. लसींचे उत्पादन वाढवण्यात येत आहे. जेणे करुन राज्यांना पुरेशा प्रमाणात लस पुरवठा करणे शक्य होईल. जुलै किंवा ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला दररोज एक कोटी लस उपलब्ध असतील, असा दावा केला आहे. यासाठी लसींचे उत्पादन वाढवावे लागणार आहे. तेव्हाच दररोज एक कोटी लस उपलब्ध करुन देणे केंद्र सरकारला शक्य होणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply