Take a fresh look at your lifestyle.

ये पॉलिटिक्स है यार.. काहीही होऊ द्या, जबाबदारी घेणार नाही अन दुसऱ्यांवर ढकलणारच की..

दिल्ली : करोनाच्या संकटात देशात रोज कोणत्या तरी मुद्द्यावर जोरदार राजकारण सुरू आहे. करोनाने आतापर्यंत लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. मात्र, या मृत्यूंवरही आता राजकारण सुरू झाले आहे. करोनामुळे झालेल्या मृत्यूंची खरी माहिती सरकारकडून लपवली जात असल्याचा आरोप विरोधक केंद्र सरकारवर करत आहेत. तर ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही त्या राज्यातही भाजप आता राज्याच्या सत्ताधाऱ्यांवर असाच आरोप करत आहे. केंद्र आणि राज्य सरकारे कोणीही करोना आणि आरोग्याच्या प्रश्नांची जबाबदारी घेतली नाही. ती दुसऱ्यांवर ढकलण्याचा खेळ जोमात चालू आहे.

Advertisement

राजस्थानमध्ये या मुद्द्यावरुन बराच वाद झाला होता. त्यामुळे सत्य काय आहे, हे कळण्यासाठी राज्य सरकारने करोना काळात झालेल्या मृत्यूंचे ऑडीट करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पार्टी आणि भाजप यांच्यातही असाच वाद सुरू झाला आहे. जागतिक दर्जाच्या सुविधांचा हवाला देत केजरीवाल सरकारने करोनाचा मृत्यूदर प्रति दहा लाखांच्या यादीत आणला आहे. करोना दगावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीतही अरविंद केजरीवाल यांनी हेराफेरी केली आहे. मागील वर्षाप्रमाणेच यंदाही करोना मृत्यूंची आकडेवारी लपवली आहे, असा गंभीर आरोप दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनी केला आहे.

Advertisement

त्यानंतर गुप्ता यांनी दिल्लीतील करोना परिस्थितीवरुन आप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की मुख्यमंत्री केजरीवाल सध्या प्रत्येक जबाबदारी केंद्रावर ढकलण्याचा प्रयत्न केला आहे. आरोग्य व्यवस्था नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत असताना केजरीवाल मात्र दुसऱ्या कोणावर तरी जबाबदारी ढकलत होते. अन्य राज्यांचा विचार केला तर प्रति दहा लाख व्यक्तींच्या हिशोबाने दिल्लीत सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. दिल्ली सरकारच्या आकडेवारीनुसार एका दिवसात ४५० पेक्षा जास्त मृत्यू झालेले नाहीत. मात्र, दिल्ली मनपाची आकडेवारी वेगळीच आहे, असे त्यांनी सांगितले. केजरीवाल यांनी करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचा खरा आकडा लपवला आहे, त्यामुळे त्यांनी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी गुप्ता यांनी केली.

Advertisement

दरम्यान, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत. आरोपही करत आहेत. त्यास भाजपकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहे. लसींची कमतरता, लसीकरणाचे नियोजन या मुद्द्यावर तर कायम आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यानंतर आता भाजपने असा आरोप केला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यास प्रत्युत्तर देणार नाहीत, असे शक्यतो होणार नाही. त्यामुळे भाजपच्या या आरोपांवर  केजरीवाल काय प्रत्युत्तर देतात, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply