Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो.. डोकेदुखीत आणखीनच वाढ झाली की..; चीनमध्येच सापडला ‘H10N3’ बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण..!

दिल्ली : अवघ्या जगाला करोनाच्या भयानक संकटात ढकलणाऱ्या चीनमध्ये आता दुसरे आजारही पसरू लागले आहेत. या देशात करोनाचा धोका अद्याप कायम असतानाच ‘H10N3’ बर्ड फ्लूचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने याबाबत माहिती दिली आहे. विशेष म्हणजे, माणसांमध्ये पहिल्यांदाच हा वायरस सापडला आहे.

Advertisement

चीनमधील झेनजियांग शहरातील ४१ वर्षांच्या व्यक्ती या विषाणूने संक्रमित झाला आहे. या व्यक्तीची प्रकृती स्थिर असून त्यास रुग्णालयातून लवकरच डिस्चार्जही देण्यात येणार आहे. मात्र, या व्यक्तीस या विषाणूने कसे संक्रमित केले याची माहिती आरोग्य विभागाने दिली नाही. चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी मात्र यास जास्त महत्व दिलेले नाही. या विषाणूमुळे महामारी पसरण्याचा धोका खूपच कमी आहे, असे स्पष्ट केले. चीनच्या आरोग्य विभागानेही असेच उत्तर दिले आहे. आरोग्य आयोगाने सांगितले, की याआधी जगभरात कुठेही H10N3 संक्रमणाची घटना घडल्याची नोंद नाही. तसेच या हा विषाणू मोठ्या प्रमाणात फैलावण्याचा धोका खूपच कमी आहे.

Advertisement

या व्हायरसचे प्रकरण अशी वेळी समोर आले आहे, ज्यावेळी करोना विषाणूच्या उत्पत्तीच्या मुद्द्यावर चीन घेरला गेला आहे. करोना विषाणू चीनच्याच वुहान प्रयोगशाळेतून जगात पसरल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे सत्य समोर आणण्यासाठी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी जगभरातून होत आहे. अमेरिकेसह काही पश्चिमी देश, युरोपीय देश आक्रमक पवित्र्यात आहेत. जागतिक आरोग्य संघटनेस आता आधिक चौकशी करण्याची गरज वाटत आहे. या घडामोडींमुळे चीनवर दबाव वाढत चालला आहे.

Advertisement

चीनने  मात्र यावर सुरुवातीला प्रतिक्रिया देऊन मौन धारण केले आहे. सहसा चीन असे कधी करत नाही. तत्काळ प्रतिक्रिया देण्यात चीन आघाडीवर आहे. मात्र, यावेळी परिस्थिती वेगळी आहे. या मुद्द्यावर चीन आधीच जगभरात बदनाम झाला आहे. या विषाणूची माहितीही चीनने उशीरा दिली. तसेच करोनाबाबत महत्वाची माहिती लपवली आहे. करोना विषाणूच्या उत्पत्तीची चौकशी करण्यासही चीन तयार नाही. त्यामुळे सध्या शांतच राहिलेले बरे, असा विचार करून चीन या मुद्द्यावर जास्त प्रतिक्रिया देताना दिसत नाही.

Advertisement

त्यातच आता बर्ड फ्लूच्या विषाणूचे प्रकरण समोर आल्याने चीनच्या अडचणी वाढणार आहेत. चीनने मात्र याबाबत आधिक माहिती दिलेली नाही. चीनमध्ये सुद्धा करोनाचे संकट अद्याप कायम आहे. ग्वांगदोंग शहरात मोठ्या संख्येने करोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चीनने या शहरात कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानंतर देशात बर्ड फ्लूचे प्रकरण समोर आले आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply