Take a fresh look at your lifestyle.

CBSE Board 12th Exam 2021 : बैठकीला सुरुवात; मोदी-शाहही उपस्थित, शिक्कामोर्तब होणार?

मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना आजारपणामुळे एम्समध्ये दाखल केलेले असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शाह यांनी 12 वीच्या बोर्ड परीक्षांबाबतच्या बैठकीत लक्ष घातले आहे. त्यांच्यासह रेल्वेमंत्री पियुष गोयल, संरक्षणमंत्री राजनाथ सिंग आणि प्रकाश जावडेकर हेही बैठकीस उपस्थित आहेत. त्यामुळे आजच यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Advertisement

(2) ANI on Twitter: “Prime Minister Narendra Modi chairs an important meeting regarding Class 12 Board Examinations https://t.co/B4uVmqoPkQ” / Twitter

Advertisement

करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात झालेली वाताहत लक्षात घेऊन आता बारावीच्या परीक्षाही नकोच असा पालक व विद्यार्थ्यांचा सूर आहे. त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या दिल्लीतील बैठकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. दरम्यान, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पुन्हा एकदा ट्विट करून बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, बारावीच्या परीक्षेबाबत मुले व पालक खूपच काळजीत आहेत. लसीकरणाशिवाय बारावीची परीक्षा घेऊ नये, असाच त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे मी केंद्र सरकारला 12 वी परीक्षा रद्द करण्याचे आवाहन करतो. मागील कामगिरीच्या आधारे त्यांचे मूल्यांकन केले पाहिजे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सीबीएसई आणि आयआयएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत भागधारकांशी बैठक घेत आहेत. अनेकांना असा विश्वास आहे की, या बैठकीत अंतिम निकाल निर्णय होऊ शकेल. याआधीही एप्रिलमध्ये पंतप्रधानांनी बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. मगच निर्णय झाला होता.

Advertisement

(1) Arvind Kejriwal on Twitter: “12वीं की परीक्षा को लेकर बच्चे और पेरंट्स काफ़ी चिंतित हैं। वे चाहते हैं कि बिना वैक्सिनेशन, 12वी की परीक्षा नहीं होनी चाहिए मेरी केंद्र सरकार से अपील है कि 12वीं की परीक्षा रद्द की जाए। पिछले performance के आधार पर उन्हें आँकलन किया जाए।” / Twitter

Advertisement

दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिक्षण सचिव आणि सीबीएसई अधिकाऱ्यांशी सल्लामसलत झाल्यानंतर घेण्यात आला. यावेळीही लाखो विद्यार्थ्यांचा असाच काहीसा निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे ट्विटरवर याबाबत ट्रेंड चालू आहेत. #cancelboardexams2021 याबाबत 62 हजारांपेक्षा जास्त ट्विटर पोस्ट आलेल्या आहेत. शिक्षण मंत्रालयाने दोन पर्याय प्रस्तावित केले होते. पर्याय 1 अंतर्गत केवळ मुख्य 19 विषयांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा सध्याच्या स्वरूपात आणि ऑफलाइन असतील. तर ऑप्शन 2 मध्ये असे सांगितले गेले आहे की, परीक्षेचा कालावधी तीन तासांवरून दीड तास करण्यात येईल आणि विद्यार्थी त्यांच्याच शाळेत परीक्षा घेऊ शकतील.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply