Take a fresh look at your lifestyle.

CBSE Board 12th Exam 2021 : आज होणार ‘निकाल’; मोदींसह जावडेकरही बैठकीला, पहा काय घडामोडी सुरू आहेत देशात

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सीबीएसईचे अध्यक्षही या बैठकीत उपस्थित आहेत. यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि शिक्षणमंत्री यांचे दोन्ही सचिवांनीही बैठकीला हजेरी लावली आहे.

मुंबई : करोनाच्या दुसऱ्या लाटेत देशभरात झालेली वाताहत लक्षात घेऊन आता बारावीच्या परीक्षाही नकोच असा पालक व विद्यार्थ्यांचा सूर आहे. त्या पार्श्वभूमीवर आज होत असलेल्या दिल्लीतील बैठकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. मात्र, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले असल्याने आजही यावर ठोस आणि अंतिम निर्णय होणार नसल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Advertisement

पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू झाली आहे. प्राप्त माहितीनुसार संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि सीबीएसईचे अध्यक्षही या बैठकीत उपस्थित आहेत. यासह केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि शिक्षणमंत्री यांचे दोन्ही सचिवांनीही बैठकीला हजेरी लावली आहे.

Advertisement

दि. 23 मे रोजी झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी चर्चा करून शिक्षणमंत्री मंगळवारी सकाळी 11 वाजता 12 वीच्या बोर्ड परीक्षांबाबत घोषणा करणार होते. परंतु आजारी असल्याने ते शक्य झाले नाही. परिणामी आज निर्णय घेण्याची शक्यता कमी झाली आहे. मात्र, तरीही आज होत असलेल्या बैठकीकडे देशाचे लक्ष लागलेले आहे. कारण, असे मानले जाते की पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व प्रस्तावित पर्यायांवर चर्चा केल्यानंतर आज अंतिम निर्णयाची घोषणा करू शकतात. अंतिम निर्णय तज्ञांकडून अपेक्षित आहे. मात्र, मोदीजींची स्टाईल लक्षात घेता आजही निर्णय होऊ शकतो.

Advertisement

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी पुन्हा एकदा ट्विट करून बारावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली. त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, बारावीच्या परीक्षेबाबत मुले व पालक खूपच काळजीत आहेत. लसीकरणाशिवाय बारावीची परीक्षा घेऊ नये, असाच त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे मी केंद्र सरकारला 12 वी परीक्षा रद्द करण्याचे आवाहन करतो. मागील कामगिरीच्या आधारे त्यांचे मूल्यांकन केले पाहिजे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी साडेपाच वाजल्यापासून सीबीएसई आणि आयआयएससी बोर्डाच्या बारावीच्या परीक्षांबाबत भागधारकांशी बैठक घेत आहेत. अनेकांना असा विश्वास आहे की, या बैठकीत अंतिम निकाल निर्णय होऊ शकेल. याआधीही एप्रिलमध्ये पंतप्रधानांनी बोर्ड परीक्षा आयोजित करण्याबाबत उच्चस्तरीय बैठक घेतली होती. मगच निर्णय झाला होता.

Advertisement

(1) Arvind Kejriwal on Twitter: “12वीं की परीक्षा को लेकर बच्चे और पेरंट्स काफ़ी चिंतित हैं। वे चाहते हैं कि बिना वैक्सिनेशन, 12वी की परीक्षा नहीं होनी चाहिए मेरी केंद्र सरकार से अपील है कि 12वीं की परीक्षा रद्द की जाए। पिछले performance के आधार पर उन्हें आँकलन किया जाए।” / Twitter

Advertisement

दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शिक्षण सचिव आणि सीबीएसई अधिकाऱ्यांशी सल्लामसलत झाल्यानंतर घेण्यात आला. यावेळीही लाखो विद्यार्थ्यांचा असाच काहीसा निर्णय अपेक्षित आहे. त्यामुळे ट्विटरवर याबाबत ट्रेंड चालू आहेत. #cancelboardexams2021 याबाबत 62 हजारांपेक्षा जास्त ट्विटर पोस्ट आलेल्या आहेत. शिक्षण मंत्रालयाने दोन पर्याय प्रस्तावित केले होते. पर्याय 1 अंतर्गत केवळ मुख्य 19 विषयांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षा सध्याच्या स्वरूपात आणि ऑफलाइन असतील. तर ऑप्शन 2 मध्ये असे सांगितले गेले आहे की, परीक्षेचा कालावधी तीन तासांवरून दीड तास करण्यात येईल आणि विद्यार्थी त्यांच्याच शाळेत परीक्षा घेऊ शकतील.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply