Take a fresh look at your lifestyle.

पीएम मोदींच्या सरकारला स्वामींचाच घरचा आहेर; पहा काय केलीय टीका..!

दिल्ली : केंद्रातील मोदी सरकार विरोधात देशातील विरोधक रोजच आरडाओरड करत असतातच. नव्हे, तो त्यांचा अधिकारही आहे म्हणा.. पण, आता विरोधक तर सोडाच खुद्द भाजपचेच नेते पक्षाला घरचा आहेर देत आहेत. यामध्ये आघाडीवर आहेत भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी.

Advertisement

केंद्र सरकारवर टीका करणे, सरकारला उपदेश देण्याचे काम खासदार स्वामी करत असतातच. आताही त्यांनी ट्विट करत आपल्याच सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. करोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेस मोठा झटका दिला आहे. याच मुद्द्यावर ट्विट करत स्वामी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. स्वामी यांनी म्हटले आहे, की ‘आता बहुतांश भारतीय नागरिक माझ्या या म्हणण्याशी सहमत आहेत, की मोदी सरकारने युपीएकडून तयार झालेली अर्थव्यवस्थेतील गडबड आधिकच वाढवली आहे. अर्थव्यवस्था अजूनही सुधारता येऊ शकते मात्र, हे कसे करायचे, हे सरकारला माहिती नाही.’

Advertisement

स्वामी यांनी करोनाच्या मुद्द्यावर याआधी सुद्धा अनेक वेळा मोदी सरकारवर टीका केली आहे. तिसऱ्या लाटेबाबतही त्यांनी म्हटले होते, की देशात करोनाची तिसरी लाट आली तर याचा सर्वाधिक धोका लहान मुलांना राहणार आहे. त्यामुळे सरकारने आवश्यक काळजी घ्यायला हवी. या व्यतिरिक्त अन्य मुद्द्यांवरही त्यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. देशातील करोना परिस्थिती हाताळण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर जबाबदारी सोपवावी, असेही त्यांनी म्हटले होते. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. तसेही सरकारने विरोधक, तज्ज्ञ मंडळी यांनी वारंवार दिलेल्या इशाऱ्यांकडेही दुर्लक्ष केले होतेच. मात्र, आपल्या पक्षाच्या नेत्याचे म्हणणे तरी सरकार ऐकेल, असे वाटत होते. मात्र, या कशाचाही उपयोग झाला नाही, असे दिसत  आहे.

Advertisement

दरम्यान, करोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याचे विरोधक म्हणतच आहे. या मुद्द्यावर कोर्टानेही मोदी सरकारला अनेकदा फटकारले आहे. या मुद्द्यावर देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील जनताही सरकारवर नाराज असल्याचे नुकत्याच केलेल्या काही सर्वेतून समोर आले होते. आणि त्यात तथ्यही दिसत आहे. दुसऱ्या लाटेत गाफील राहिल्याने करोना विषाणू फोफावला, हे तर जगजाहीरच आहे. या लाटेत लाखो लोक करोनाच्या विळख्यात सापडले. लाखो रुग्णांचे प्राण गेले. काही जणांना तर केवळ ऑक्सिजन मिळाला नाही म्हणून प्राणास मुकावे लागले. हे कमी म्हणून की काय आता सरकारचे लसीकरणाचे नियोजनही कोलमडल्याचे दिसत आहे.  या मुद्द्यावरही विरोधक केंद्र सरकारवर जोरदार टीका करत आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply