Take a fresh look at your lifestyle.

म्हणून केंद्र सरकारने आणलीय ‘ती’ खास योजना; पहा शेतकऱ्यांना कस होणार फायदा..!

दिल्ली : देशात करोनाच्या संकटा पाठोपाठ महागाईने सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. खाद्यतेलांचे भाव इतके वाढले आहेत, की संपूर्ण बजेट कोलमडले आहे. सध्याची परिस्थिती पाहता तेलांच्या किमती कमी होतील, याची शक्यता वाटत नाही. त्यामुळे देशातील नागरिकांना दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांना तेलबिया बियाणे मोफत देणार आहे. त्यामुळे लोकांना माफक दरात खाद्यतेल उपलब्ध होऊ शकेल.

Advertisement

कृषी मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे, की आगामी खरीप हंगामासाठी तेलबिया बियाणे मोफत देण्यात येतील. देशात तेलबियांचे उत्पादन वाढवण्यासाठी सरकार साधारण ८ लाख सोयाबीने बियाण्यांचे मिनी कीट आणि ७४ हजार शेंगादाणा बियाण्यांचे कीट देणार, असे मनी कंट्रोलने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. देशातील ४१ जिल्ह्यांत सोयाबीन बियाण्यांचे वाटप करण्यात येणार आहे. देशात आजमितीस खाद्यतेलांच्या किमती खूपच वाढल्या आहेत. मागील वर्षभराच्या काळातच तेलांच्या किमतीत तब्बल ६२ टक्के वाढ झाली आहे. एक लिटर मोहरीच्या तेलासाठी १७० रुपये मोजावे लागत आहेत. मागील वर्षात  १२० रुपये द्यावे लागत होते. म्हणजेच, फक्त एका वर्षाच मोहरीच्या तेलाच्या किमतीत ५० रुपये वाड झाली आहे. शेंगादाणा तेल, सोयाबीन तेल, पाम तेल आणि सूर्यफूल तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. नागरिकांनाम मात्र जास्त पैसे द्यावे लागत असल्याने त्यांचे बजेट कोलमडले आहे.

Advertisement

खाद्यतेलांच्या किमती कमी करण्यासाठी राज्य सरकारांनी त्यांच्या पातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, करोनात अडकलेल्या राज्यांनी अद्याप या मुद्द्याकडे लक्ष दिल्याचे दिसत नाही. त्यामुळे अजून तरी तेलांच्या किमती कमी झालेल्या नाहीत. भारतात तेलाचे उत्पादन खूपच कमी आहे. भारत दरवर्षी ७० टक्के खाद्यतेल आयात करतो. यासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जातात. त्यामुळे आता देशांतर्गत तेल उत्पादन वाढवून तेलाच्या किमती कमी करण्याच्या उद्देशाने प्रयत्न करण्यात येत आहेत. त्या दृष्टीनेच हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाची मागणी वाढली आहे. चीन कडून तेलाची मागणी वाढली आहे. चीन सध्या मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे. त्याचा परिणाम म्हणून दुसऱ्या देशांना तेल कमी प्रमाणात मिळत आहे. आणि तेलाच्या किमतीही वाढल्या आहेत. याचा फटक भारतासह जगातील अन्य देशांना बसत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply