Take a fresh look at your lifestyle.

‘आप’ल्यातला राजकीय वाद काही मिटेना; पहा मोदींच्या भाजपवर काय झालाय गंभीर आरोप..!

दिल्ली : लसीकरणाच्या मुद्द्यावर दिल्ली आणि केंद्र सरकार यांच्यात सुरू असलेला वाद लवकर मिटण्याची चिन्हे दिसत नाहीत. संकटाच्या काळात राजकारण नको, असे मुख्यमंत्री केजरीवाल कितीही म्हणत असले तरी त्याचा काहीच उपयोग झालेला नाही. कधी स्वतः मुख्यमंत्री तर कधी उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे आमदार केंद्र सरकावर टीका करत असतात. टीका केली म्हटल्यानंतर भाजपकडूनही त्यास प्रत्युत्तर मिळतेच. हे असेच सुरू असल्याने वाद आधिकच वाढत असून या राजकारणात मात्र नागरिक भरडले जात आहेत.

Advertisement

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी पुन्हा करोना लसींच्या मुद्द्यावर केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटले, की भाजप नेते मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करतात. मात्र, मुख्यमंत्री केजरीवाल लोकांसाठी काम करत आहेत. केंद्रातील सत्ताधारी पक्षाने कितीह टिका केली तरी केंद्राकडे लसींची मागणी करतच राहणार आहोत. ज्यावेळी लसी खरेदी करण्याची वेळ होती तेव्हा भाजप मात्र निवडणुकीत व्यस्त होता. निवडणुकांचे नियोजन करण्याच्या कामात करोनाकडे दुर्लक्ष झाले. देशात आता तिसरी लाट येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. तिसरी लाट आलीच तर परिस्थिती गंभीर होऊ नये यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच तिसरी लाट येण्याआधीच दिल्लीतील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण करण्यास आम्ही कटीबद्ध आहोत, असे सिसोदिया यांनी सांगितले.

Advertisement

लसींच्या मुद्द्यावर आम आदमी पार्टीचे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या केंद्र सरकारवर टीका करत आहेत. याआधी केजरीवाल यांनीही केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. उपमुख्यमंत्री सिसोदिया सुद्धा सातत्याने टीका करत आहे. त्यास भाजपचे नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. दिल्ली भाजपचे अध्यक्ष आदेश गुप्ता यांनीही करोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकडेवारीत दिल्ली सरकार हेराफेरी करत आहे. मुख्यमंत्री केजरीवाल करोना मृतांची खरी आकडेवारी देत नाहीत, असा आरोप गुप्ता यांनी केला होता. तसेच या प्रकाराबद्दल केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. यावर अद्याप मुख्यमंत्री केजरीवाल यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply