Take a fresh look at your lifestyle.

योगीराज्यात विषारी दारूप्रकरणी भाजपचेही कनेक्शन उघड; तब्बल 85 जणांचा झालाय मृत्यू..!

दिल्ली : राजकारणात दिसणारे मतभेद हे व्यावहारिक पातळीवर अनेकदा अर्थपूर्ण मित्रत्वाचे संबंध असल्याचे स्पष्ट झालेले आहे. असाच प्रकार आता मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उत्तरप्रदेश राज्यातील अलीगड विषारी दारूच्या प्रकरणात समोर आलेले आहेत. यात भाजपच्या दिग्गज स्थानिक नेत्यांसह इतर राजकीय पक्षांचेही कनेक्शन उघडकीस येत आहे. आतापर्यंत या प्रकरणात तब्बल 85 जणांचा मृत्यू झालेला आहे.

Advertisement

अलिगड दारू प्रकरणात मोठी कारवाई करत सरकारने उत्पादन शुल्क आयुक्त पी. ​​गुरुप्रसाद यांना निलंबित करून टाकले आहे. यापूर्वी संयुक्त उत्पादन शुल्क आयुक्त या पातळीपर्यंतच्या अधिकाऱ्यावर कारवाई केली होती. या प्रकरणात आतापर्यंत 13 पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे अर्धा डझनहून अधिक अधिकारी व कर्मचारी निलंबित करण्यात आले आहेत. प्रतिनियुक्तीकडून परत आलेल्या रिग्झ्यान सामफिल यांना नवीन उत्पादन शुल्क आयुक्त करण्यात आले आहे. आतापर्यंतचे सर्वात मोठे तस्कर म्हणून आरएलडी नेते ऋषी शर्मा यांचे नाव यात येत आहे. आता भाजप नेते रवींद्र पाठक उर्फ ​​रिंकू यांचेही नाव शहरातील या विषारी दारू विक्रीत पुढे आले आहे. रिंकू भाजपमध्ये सक्रिय असून 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून शहर जागेसाठी तिकीट हक्क सांगत होते.

Advertisement

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणात जातीने लक्ष घालून आहेत. सरकारला सतत डीएम पातळीवरून अहवाल देण्यात येत आहेत. अतिरिक्त मुख्य सचिव व उत्पादन शुल्क प्रधान सचिव संजय भुसेरेड्डी यांनी सोमवारी दुपारी डीएमशी चर्चा केली. यात त्यांनी दारूच्या घटनेमुळे झालेल्या मृत्यू आणि आतापर्यंतची कारवाई इत्यादींचा अहवाल घेतला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या प्रकरणावर बारीक नजर ठेवून आहेत. अशी माहिती मिळाली आहे की लवकरच मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री पातळीवरुन कोणीतरी अलिगढ भेट देण्यासाठी येऊ शकतात.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply