Take a fresh look at your lifestyle.

तो आलाय..! केरळात मॉन्सूनचे जोरात आगमन, राज्यभर लवकरच पावसाला सुरुवात होणार

मुंबई : सगळे अंदाज, तर्क-वितर्क, चर्चा बाजूला सारत अखेर रविवारी (ता.30) मे रोजीच मॉन्सून केरळात दाखल झाला. ‘यास’ चक्रीवादळामुळे यंदा मॉन्सून दोन दिवस उशिरा येणार असल्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, केरळात मॉन्सून दाखल झाल्याचे वृत्त ‘स्कायमेट वेदर’ने प्रसिद्ध केले आहे. पुढील आठवडाभरात संपूर्ण राज्यभर पावसाला सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement

भारतीय हवामान विभागाने 1 जूनला केरळात माॅन्सूनचे आगमन होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला होता. मात्र, हवामान विभागाला चुकीचे ठरविताना वेळेआधीच केरळात माॅन्सूनचे आगमन झाले. वाऱ्याची बदललेली दिशा, पूरक वातावरणामुळे वरुणराजाचे धडाक्यात केरळात आगमन झाले.

Advertisement

पुढील काही दिवसांत देशात माॅन्सूनसाठी पूरक वातावरण निर्मिती होऊन, देशभर पावसाला सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. उत्तर-पूर्व भागातही त्याचे पडसाद दिसून येतील. किनारपट्टी भागात जूनच्या पहिल्या भागात वादळी वाऱ्यांची निर्मिती माॅन्सूनसाठी आणखी पूरक ठरणार आहे.

Advertisement

माॅन्सूनच्या आगमनासाठी ठराविक गोष्टी आणि त्यांच्या पूर्ततेची आवश्यकता असते. दक्षिण-पूर्व अरबी समुद्रातील वारे यात महत्त्वाची भूमिका बजावून गेले. याच धर्तीवर उत्तर अंदमान समुद्र आणि पोर्ट ब्लेअर, निकोबार, मायाबंदर भागांमध्ये मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहण्याची शक्यता ‘स्कायमेट’ने वर्तवली आहे.

Advertisement

केरळ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, लक्षद्वीप भागांतही येत्या काळात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळू शकते. या काळात समुद्रही खवळलेला असेल, त्यामुळे मासेमारी करणाऱ्यांनीही सतर्क राहावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • फेसबुकट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply