Take a fresh look at your lifestyle.

इव्हेंट मॅनेजर स्टंटबाज मोदींमुळे ‘त्याची’ गळचेपी; गडकरी इज ‘राइट पर्सन इन राँग पार्टी’ : कॉंग्रेस

प्रदेश काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक विलास औताडे, जिल्हा अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांच्यासह अनेकजण या पत्रकार परिषदेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी झालेले होते.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या सात वर्षांच्या कार्यकाळात विशेष काहीही झालेले नाही. उलट हॉलीवूड- बॉलीवूड- टॉलीवूडलाही लाजवत केवळ स्टंटबाजी आणि इव्हेंट मॅनेजमेंट करण्याचे काम मोदींनी केले आहे. परिणामी देशातील मूळ प्रश्नांकडे कायम दुर्लक्ष झालेले आहे. त्यामुळे देशात लोकशाही मूल्यांची गळचेपी करत तपास यंत्रणांचा गैरवापरही चालू असल्याची गंभीर टीका कॉंग्रेस पक्षाने केली आहे.

Advertisement

काँग्रेसचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आॅनलाइन पत्रकार परिषदेत मोदींवर टीका करतानाच महाराष्ट्राचे नेते आणि केंद्रातील सक्षम मंत्री नितीन गडकरी यांचे कौतुक केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, गडकरी ‘राइट पर्सन इन राँग पार्टी’ आहेत. केंद्र सरकारमध्ये नितीन गडकरींचे काम चांगले असून इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही गडकरींचा सर्वांशी चांगला संवाद आहे. त्यांचेच पंख छाटण्याचे काम मोदी सरकारकडून सुरू आहेत.

Advertisement

प्रदेश काँग्रेस सेवादलाचे मुख्य संघटक विलास औताडे, जिल्हा अध्यक्ष डॉ. कल्याण काळे, शहर अध्यक्ष हिशाम उस्मानी, प्रवक्ते डॉ. संजय लाखे पाटील यांच्यासह अनेकजण या पत्रकार परिषदेत ऑनलाइन पद्धतीने सहभागी झालेले होते. त्यामध्ये मंत्री अशोक चव्हाण यांनी मांडलेले मुद्दे असे :

Advertisement
  • महाराष्ट्र व गुजरातला वादळाचा फटका बसल्यावर गुजरातमध्ये जाऊन पाहणी करून आलेल्या मोदींनी फ़क़्त गुजरातलाच मदत केली.
  • रेमडेसिविर इंजेक्शन, लसींच्या पुरवठ्याबाबतही त्यांनी महाराष्ट्राबाबत दुजाभाव करण्याचे काम मोदींनी केले.
  • कोरोनाच्या काळात केंद्र सरकारची अकार्यक्षमता, अति आत्मविश्वास आणि अति उत्साह आंतरराष्ट्रीय पातळीवर चव्हाट्यावर आल्याचा फटका बसणार आहे.
  • अहोरात्र जळणाऱ्या चिता आणि गंगेत वाहणाऱ्या शेकडो शवांची आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये येणारी छायाचित्रे व त्यातून हाेणारी देशाची अप्रतिष्ठा पाहून एक भारतीय म्हणून मनाला प्रचंड वेदना होतात.
  • मागील सात वर्षांत देशाला दमदार पण पोकळ भाषणे मिळाली, खोटी आश्वासने मिळाली, आणि आम्ही जो शब्द दिला, तो तर केवळ निवडणुकीचा एक जुमला होता, असे सांगण्याइतपत निर्ढावलेपणा मिळाला.
  • मागील सात वर्षांत देशाला बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी आणि ढासळती अर्थव्यवस्था मिळाली. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना शंभरीपार झालेले पेट्रोल मिळाले. गरिबांना अधिक गरीबी तर निवडक धनदांडग्यांना अधिक श्रीमंत होण्याची खुली सूट मिळाली.

त्यांनी म्हटले आहे की, मागील सात वर्षांत देशाला आधीच्या पिढ्यांनी दूरदर्शीपणे उभी केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून चैन करणारे दिवाळखोर सरकार मिळाले. साम, दाम, दंड, भेद कसेही का होईना, पण फक्त निवडणूक जिंकणे हेच एकमेव उदिद्ष्ट ठेवून काम करणारी सत्तापिपासू राजकीय व्यवस्था मिळाली.

Advertisement

Ashok Chavan on Twitter: “मागील सात वर्षांत देशाला नोटबंदी, जीएसटी, कोरोनाकडे दुर्लक्ष अशा एका पाठोपाठ एक विनाशकारी घोडचुका मिळाल्या. खा. @RahulGandhi आणि @INCIndia ने त्या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही केवळ राजकीय अहंकारातून त्यात सुधारणा नाकारणारे हटवादी राज्यकर्ते मिळाले. #7yearsOfModiMadeDisaster” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply