Take a fresh look at your lifestyle.

आरोग्यदायी माहिती : म्हणून भारतात सापडले काळ्या बुरशीचे रुग्ण; पहा फंगल इन्फेक्शनचे नेमके काय आहेत कारण

पुणे : काळ्या, पांढऱ्या आणि पिवळ्या बुरशीची लागण असलेले रुग्ण सापडण्याचा सपाटा सध्या भारतात चालू आहे. त्याचवेळी जगभरात असे रुग्ण सापडतात की नाहीत, याचेही कोडे आपल्याला पडले आहे. कारण, जगभरातून कोविड 19 या करोना विषाणूजन्य रोगाचा फैलाव होत असल्याच्या बातम्या येत असतानाच असे इतर आजार आणि त्याचे रुग्ण यांच्या बातम्या येत नाहीत. त्यावरच आता तज्ञांनी प्रकाशझोत टाकला आहे.

Advertisement

कोरोना विषाणूच्या पहिल्या लाटेनंतर सरकारी आणि वैयक्तिक पातळीवर केल्या गेलेल्या दुर्लक्षाचा परिणाम सध्या दुसर्‍या लाटेमध्ये अवघा भारत देश भोगत आहे. करोनाला मूठमाती दिल्याच्या आणि राजकीय लाभ घेण्याच्या कठोर स्पर्धेत अडकलेल्या भारत देशात इतर आजाराचे रुग्ण सापडत आहेत. दुसर्‍या लाटेत रुग्णालयांमध्ये बेड आणि ऑक्सिजन मिळाले नसल्यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. आता रुग्णसंख्या कमी झालेली आहे. तर, दुसरीकडे काळ्या बुरशीचे रुग्ण खूपच वेगाने वाढत आहेत. कोविडनंतर आता बर्‍याच लोकांना नवीन फंगल इन्फेक्शनचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भीती आहे. मधुमेहाचे रुग्ण किंवा ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमकुवत आहे अशा रूग्णांनाच म्यूकोर्मिकोसिस किंवा बुरशीजन्य संसर्गाची गंभीर लागण होते.

Advertisement

भारतात आताही अनेक ठिकाणी रुग्णालयात प्रशिक्षित स्टाफ कमी आहे. काही रुग्णालयात स्वच्छता कर्मचारी हाच वॉर्ड बॉय आणि अगदी इंजेक्शन देणाराही असू शकतो. तोच कर्मचारी मग ऑक्सिजन व्हेंटिलेटरमधील पाणी बदलणे किंवा सिलिंडर बदलण्याचे काम करतो. सरकारी आणि काही खासगी रुग्णालयात व्हेंटिलेटरमधील पाणी नातेवाईकांनी बदलले असल्याचे आपणही नेहमी पाहतो. त्यासाठी अगदी नळाचे किंवा मिळेल तेच पाणी अस्वच्छ हाताने टाकले जाते. त्याने मग फंगल इन्फेक्शन वाढण्याची शक्यता साहजिकच असल्याचे निरीक्षण सामाजिक-राजकीय अभ्यासक प्रवीण अनभुले यांनी नोंदवले आहे.

Advertisement

यापूर्वी म्यूकोर्मिकोसिसला जाइगोमाइकोसिस (zygomycosis) म्हणून ओळखला जात होते. हा एक गंभीर बुरशीजन्य संसर्ग आहे. ही बुरशी म्यूकोर्मिसेट्स नावाच्या मोल्डच्या गटामधील आहे., सामान्यत: माती, झाडे, सडलेली फळे आणि भाज्यांमध्ये ही बुरशी आढळते. मधुमेह आणि कमकुवत रोग प्रतिकारशक्ती असलेले लोक यांना या आजाराचे संक्रमण वेगाने होते. इम्यूनो सप्रेसेंट (immunosuppressant) सारख्या स्टिरॉइड औषधांचा वापर करून किंवा केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते. असे रुग्ण कोविडसारख्या धोकादायक व्हायरस आणि जंतूशी लढण्यास असमर्थ असल्याने नंतर गंभीर लक्षणांचे बळी बनतात. या बुरशीजन्य संसर्गाचा सामान्यत: सायनस, मेंदू किंवा फुफ्फुसांवर परिणाम होतो.

Advertisement

मधुमेह आणि विविध इम्युनो-सप्रेसंट स्टिरॉइड औषधे बुरशीजन्य संसर्गाची मुख्य कारणे म्हणून नोंदविली जात आहेत. भारत सरकारचे आरोग्य सेवा संचालक डॉ. सुनील कुमार यांच्या म्हणण्यानुसार, वातावरण अशुद्ध असताना त्या परिस्थितीत बुरशीची वाढ होण्याचा धोका जास्त असतो. वातावरणात ओलावा असल्यामुळे आणि कोविड रूग्णांवर अस्वच्छ साहित्याने उपचार झाल्यास अशा वातावरणात संक्रमणाचा धोका जास्त असतो. टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे संचालक डॉ. प्रवेश सीएस यांनी नुकत्याच तयार केलेल्या ट्विटर थ्रेडनुसार बुरशीजन्य संसर्गाची अनेक कारणे आहेत. त्यांनी म्हटले आहे की, मधुमेह, स्टिरॉइड औषधे, केमोथेरपी यामुळे याचा प्रादुर्भाव वाढतो. या व्यतिरिक्त औद्योगिक ग्रेड ऑक्सिजनमध्ये फिल्टर वॉटरचा वापर, ह्युमिडिफायर्समध्ये अशुद्ध पाणी वापरणे, वापरलेले मास्क खूप दिवस वापरणे आणि प्रतिजैविकांचा जास्त वापर करणे हे देखील बुरशीजन्य संसर्गाचे घटक आहेत.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply