Take a fresh look at your lifestyle.

वाईटच की.. करोनाच्या लाटेत अर्थव्यवस्था हतबल; पहा कसा परिणाम झालाय भारतावर..!

मुंबई : करोनाने देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान केले आहे. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक संकटे आली. त्यामुळेही नुकसान सहन करावे लागले. पहिल्या लाटेचा जोर ओसरल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा पूर्वपदावर येत असतानाच दुसऱ्या लाटेने थैमान घातले. यावेळी तर पहिल्या लाटेच्या तुलनेत परिस्थिती आधिक बिकट बनली. त्यामुळे दुसऱ्या लाटेतही अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. याबाबत काही अर्थतज्ज्ञांनी एक सर्वे केला असून याद्वारे सरकारचे टेन्शनमध्ये वाढ होईल, अशी माहिती मिळाली आहे.

Advertisement

अर्थतज्ज्ञांनी केलेल्या सर्वेत असे दिसून आले, की आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेत मार्च महिन्यात जीडीपी एक टक्क्याने वाढला होता. मागील तिमाहीच्या तुलनेत ०.४ टक्के वाढ झाल्याचेही दिसून आले. आता मात्र, दुसऱ्या लाटेमुळे देशाच्या आर्थिक प्रगतीत घट येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दुसऱ्या लाटेत परिस्थिती गंभीर होत असल्याने अनेक राज्यांनी लॉकडाऊन केला. यामध्ये देशातील औद्योगिक राज्येही होती. या निर्णयामुळे अनेक लोकांचे रोजगार गेले. उद्योग-व्यवसाय, कंपन्या बंद असल्याचा फटका बसला. त्यामुळे आर्थिक वाढीचा वेग घटणार असल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे मात्र, केंद्र सरकारने असा दावा केला आहे, की मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षात आर्थिक प्रभाव जास्त गंभीर राहणार नाही. कारण, यावेळी देशव्यापी लॉकडाऊन केलेला नव्हता.

Advertisement

विशेष म्हणजे, पहिल्या लाटेचा जोर कमी झाल्यानंतर या वर्षात जानेवारी ते मार्च दरम्यान अर्थव्यवस्थेत सुधारणा झाली होती. त्यामुळे आर्थिक विकासाचा दरही वाढला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या लाटेने थैमान घालण्यास सुरुवात केली. या लाटेस रोखण्यासाठी राज्यांनी लॉकडाऊन आणि काही ठिकाणी निर्बंध कठोर करण्यात आले. त्यामुळे अर्थव्यवस्थेस पुन्हा झटका बसला आहे. अजूनही धोका टळला नसल्याने राज्यानी लॉकडाऊन मागे घेतलेले नाही. उलट, लॉकडाऊन आणखी वाढवले आहेत. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार कितीही दावे करत असले तरी आर्थिक घोडदौड कमीच राहणार असल्याचा अंदाज अर्थतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. दुसरीकडे, करोनाच्या दुसऱ्या लाटेत बेरोजगारी, गरीबी वाढली आहे.  देशांतर्गत व्यापाराचे मोठे नुकसान झाले आहे. उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत. अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केली आहे. महागाई वाढली आहे. या संकटांचाही परिणाम अर्थव्यवस्थेवर होणार आहे. यामध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply