Take a fresh look at your lifestyle.

चीननेच वाढवली पाकिस्तानची डोकेदुखी; पहा नेमके काय चाललेय शेजारच्या दोन्ही ‘हितमित्रां’मध्ये..!

दिल्ली : आर्थिक संकटात पुरता अडकलेला आणि कर्जबाजारी म्हणून ओळखला जाणाऱ्या पाकिस्तानला त्याच्याच मित्र देशाने जोरदार झटका दिला आहे. त्यामुळे आधीच अडचणीत असलेल्या या देशाच्या अडचणी आधिकच वाढणार आहेत. पाकिस्तानने अन्य देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांकडून अब्जावधींचे कर्ज घेतले आहे. कर्ज घेतले म्हणजे कधीतरी ते व्याजासह चुकते करावे लागणारच ना.. मात्र, कर्ज चुकते करण्यासाठी सुद्धा पैसे नाहीत, मग काय करायचे. एक तर आधीच कर्ज देण्यासाठी पुन्हा कर्ज घ्यायचे किंवा कर्जाचे पुनर्गठण करण्यासाठी संबंधित देशांकडे विनंती करणे, असे काम आता पाकिस्तानचे राज्यकर्ते करत आहेत.

Advertisement

मात्र, या प्रयत्नात त्यांना प्रत्येक वेळी यश मिळेलच असेही नाही. कारण, पाकिस्तानला मित्र देशाने म्हणजेच चीनने जोरदार झटका दिला आहे. चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडोर प्रकल्पांतर्गत घेतलेल्या ३ अब्ज डॉलर्सच्या कर्जाचे पुनर्गठण करावे, अशी मागणी पाकिस्तानने केली होती. मात्र, चीनने यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. एशिया टाइम्सच्या रिपोर्टनुसार, चीनने पाकिस्तामध्ये तयार करण्यात आलेल्या ऊर्जा प्रकल्पात १९ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. चीनने म्हटले आहे, की ऊर्जा खरेदीबाबत जो काही करार झाला आहे, त्यात पुनर्गठीत करणे आता शक्य नाही. कारण, कर्जात सवलती द्यायच्या असतील बँकांना नियम आणि अटींमध्ये बदल करावे लागतील. त्यामुळे आता यामध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करता येणार नाही.

Advertisement

चीनच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला मोठा झटका बसला आहे. कर्जात सवलती मिळण्याचा मार्गही आता बंद झाला आहे. त्यामुळे आता काय करायचे, असा प्रश्न राज्यकर्त्यांन पडला आहे. देशातील विरोधी पक्ष मात्र सरकावर जोरदार टीका करत आहे. महागाई तर आहेच. यातून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. दुसरीकडे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अर्थव्यवस्थेस आधार देण्यासाठी कर्ज मिळणे आवश्यक आहे. यासाठीच पाकिस्तानचे सत्ताधारी दुसऱ्या देशांचा दौरा करत आहे. तेथे जाऊन कर्ज मागत आहेत. यामुळे देशाचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. दरम्यान, भारता विरोधात चीन आणि पाकिस्तान एकत्र आले आहेत. दोन्ही देश आपले उद्दीष्ट साध्य करत आहेत. मात्र, आता चीनने त्याचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. आधी अब्जावधींचे कर्ज देऊन पाकिस्तनला कर्जाच्या जाळ्यात अडकवले. नंतर आता या कर्जात सवलत देण्यासही नकार दिला आहे. त्यामुळे पाकिस्तानची डोकेदुखी मात्र चांगलीच वाढली आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply