Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ मुद्द्यावर भाजप झाली आक्रमक; दिले काँग्रेस पक्षालाच ‘हे’ आव्हान..!

दिल्ली : संकटाच्या काळात राजकारण देशास काही नवीन नाही. आताही करोनाच्या संकटात राजकारण जोरात सुरू आहे. काँग्रेस आणि भाजप यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एखाद्या नेत्यानी काही टीका केली की लगेच त्यास प्रत्युत्तर दिले जात आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत केंद्रातील सत्ताधारी भाजपवर जोरदार टीका केला. या टीकेस आज भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी काँग्रेस आणि कमलनाथ यांच्यावर टीका केली आहे.

Advertisement

काँग्रेसने कोविड १९ विरुद्ध देशाची लढाई कमजोर करण्याचे काम केले आहे, असा आरोप भाटिया यांनी केला. पाकिस्तान सारख्या देशांना भारतास बदनाम करण्याची संधी विरोधी पक्ष देत आहे, असे त्यांनी सांगितले. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केलेल्या वक्तव्याची त्यांनी निंदा केली. भारतास बदनाम करणे यासच काँग्रेस आता प्राधान्य देत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याआधी कमलनाथ यांनी म्हटले होते करोनाच्या प्रसारामुळे भारत जगात बदनाम झाला आहे. त्यांच्या या वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले. भाजपच्या नेत्यांनी त्यांच्यावर चौफेर टीका केली. त्यानंतर आज पुन्हा भाटिया यांनी या मुद्द्यावर थेट काँग्रेसलाच जाब विचारला. या मुद्द्यावर काँग्रेसने आता स्पष्टीकरण दिले पाहिजे, असे भाटिया पत्रकार परिषदेत म्हणाले.

Advertisement

करोना काळात केंद्र सरकारला घेरण्याची विरोधकांची रणनिती आहे. विरोधी पक्षांचे नेते या मुद्द्यावर सातत्याने टीका करत आहे. तसेही दुसऱ्या लाटेत देशात परिस्थिती खूपच बिघडली होती. ऑक्सिजन अभावी अनेक रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांना उपचार मिळाले नाहीत. या लाटेत रुग्णसंख्या वेगाने वाढल्याने देशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून गेली. त्यानंतर आता लसीकरणाचे योग्य नियोजनही सरकारला करता आलेले नाही. आज ज्या वेळी वेगाने लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे, त्यावेळी मात्र लसी नसल्याने अनेक लसीकरण केंद्रे बंद ठेवण्याची नामुष्कीची वेळ राज्यांवर आली आहे. म्हणून केंद्र सरकारच्या या कारभारावर विरोधक आक्रमक झाले आहेत. तसे ते सहाजिकच आहे. केंद्र सरकारने निदान आता तरी लसीकरणाचे योग्य नियोजन करुन राज्यांना पुरेशा प्रमाणात लसी द्याव्यात, असे केले तरच लसीकरण मोहिम वेगाने राबवता येणे शक्य असल्याचे राज्यांचे म्हणणे आहे. केंद्राच्याही ही गोष्ट लक्षात आल्याने केंद्र सरकार लसीकरणाचे नियोजन करत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply