Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनो, तयार आहात ना..? ‘मोदीमंत्र’ ट्विटर ट्रेंडमध्ये; पहा नेमका काय होणार फायदा..!

पुणे : कोणतीही छोटी-मोठी गोष्ट असो त्याचा मोठा डांगोरा पिटणे आणि स्टंटबाजी करणे यात भाजपचा कोणीही हात धरू शकत नाही. त्याच भाजपने आता चक्क शेतकऱ्यांना एक मोदीमंत्र दिला आहे. सध्या त्याचा ट्विटरवर जोरात ट्रेंड केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

Advertisement

Vipin Singh on Twitter: “किसानों की खुशहाली के लिए ये सरकार हमेशा दृढ़ संकल्पीत है। धन्यवाद हमारे यशस्वी प्रधानमंत्री @narendramodi जी 🙏 #IFFCONanoUrea https://t.co/73pOYGLc6F” / Twitter

Advertisement

हा ट्रेंड आहे युरिया या महत्वाच्या रासायनिक खताचा. देशात हरितक्रांतीमध्ये मोठा वाटा असलेले हे रासायनिक खत बेसुमार वापरामुळे आता निगेटिव्ह ट्रेंडमध्ये आहे. सेंद्रिय शेतीचा डंका जोरात असतानाच खताचे भाव जोरात वाढल्याने आता शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे. काही खतांचे भाव अनुदान देऊन कमी केलेले असतानाच काही खतांचे भाव सामान्य शेतकऱ्यांच्या आवाक्याच्या बाहेर गेलेले आहेत. त्याचाच शेतमालास भाव मिळण्याचा प्रश्न कायम आहे. अशावेळी आता विद्राव्य खतही शेतकरी वापरत आहेत. त्यात आता आणखी एक क्रांतिकारी बदल होत आहे. तो म्हणजे नॅनो युरिया.

Advertisement

Shiv Patel on Twitter: “Thank you Narendra Modi ji for such a gift to our farmers brothers and sisters. #IFFCONanoUrea @YogiDevnath2 https://t.co/Tl3uGWK69l” / Twitter

Advertisement

४५ किलोच्या युरिया गोणीच्या ऐवजी फ़क़्त ५०० मिली नॅनो युरिया लिक्विड वापरण्याची खास सोय शेतकऱ्यांना मिळणार आहे. इफ्को कंपनीच्या या क्रांतिकारी उत्पादनामुळे शेतीमध्ये रासायनिक खतावर होणारा खर्च नक्कीच कमी होणार आहे. शेतकऱ्यांनी याचे दणक्यात स्वागत केले आहे. कंपनी आणि संशोधकांच्या या यशाला अनेकांनी ट्विटरवर सलाम केला आहे. तर, याच मुद्द्याचा नेहमीप्रमाणे या भारतात राजकीय वापरही जोमात सुरू आहे. भाजपच्या आयटी टीमने याचे आयतेच श्रेय घेण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांना या नव्या क्रांतिकारी उत्पादनाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. ५०० मिली नॅनो युरिया लिक्विड फ़क़्त २४० रुपयांना शेतकऱ्यांना मिळणार आहे. ज्याचा वापर थेट स्प्रेअरमधून करता येणार आहे.

Advertisement

Shiv Patel on Twitter: “Nano nitrogen is a patent product of IFFCO. It is in liquid form and 500 ml of nano nitrogen is equivalent to a 50 kg bag of urea in its impact. #IFFCONanoUrea @TheDeepak2020In https://t.co/mYrcaeOuqk” / Twitter

Advertisement

इफ्को या शेतकऱ्यांच्या कंपनीने हे नवीन उत्पादन बाजारात आणलेले आहे. त्यासाठी कंपनी किंवा त्याच्या उत्पादनात महत्वपूर्ण भूमिका बजावणारे संशोधक यांना श्रेय मिळणे बाजूलाच राहिले आहे. नेहमीप्रमाणे सगळे काही मोदीजीच करीत असल्याच्या थाटात ट्विटरवर सध्या IFFCONanoUrea ट्रेंडमध्ये असताना त्याचे श्रेय आणि क्रांतिकारी यश मोदीजींच्या नावावर खपवले जात आहे.

Advertisement

Deepak Chaurasia on Twitter: “मिट्टी में यूरिया के प्रयोग में कमी लाने के लिए प्रधानमंत्री मोदी ने देश के किसानों से की अपील। इफको की अनुसंधान टीम ने बना डाला नैनो यूरिया जिसका पर्णीय छिड़काव किया जाएगा। #IFFCONanoUrea” / Twitter

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply