Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेच्या अडचणीत वाढ; पहा कोणत्या प्रकरणावर सुरू झालीय चौकशी, भाजपने सुरू केले आरोप

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पद आणि महाविकास आघाडी सरकारच्या मागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याची चिन्हे नाहीत. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या कारानाम्याचे प्रकरण अडचणीत आणणारे ठरल्यामुळे हादरा बसलेल्या राज्य सरकारला आणखी एक डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष यातून कसा मार्ग काढतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यातच भाजपने जोरदार आरोप सुरू केले आहेत.

Advertisement

प्रादेशिक परिवहन विभागात बदलीसाठी ३०० कोटींचा अपहार झाल्याचा आरोप करत एका निलंबित अारटीअो अधिकाऱ्याने थेट नाशिक पोलिसांना इ-मेलद्वारे तक्रार देण्याचे हे गंभीर प्रकरण आहे. अर्जाची गंभीर दखल घेत पोलिस अायुक्तांनी उपायुक्तांच्या मार्फत याच्या चौकशीला हिरवा कंदील दाखवला आहे. परिवहनमंत्री अनिल परब, नाशिक परिवहन विभागातील तत्कालीन अाणि विद्यमान सहा वरिष्ठ अधिकाऱ्यांवर या तक्रार अर्जात आरोप असल्याने खळबळ उडाली अाहे.

Advertisement

(1) Atul Bhatkhalkar on Twitter: “आरटीओच्या निलंबित अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून परिवहनमंत्री @advanilparab यांच्याविरुद्ध पदोन्नतीत गैरव्यवहार केल्याप्रकरणी नाशिक पोलिसांनी चौकशी सुरू केलीय. मुख्यमंत्री @OfficeofUT यांचे निकटवर्तीयच घोटाळ्यात अडकल्याने ठाकरे सरकारच आरोपीच्या पिंजऱ्यात अडकलेय.#mahavasooliaaghadi https://t.co/HKNP55I6kc” / Twitter

Advertisement

लाचेचा घोटाळा ३०० कोटी रुपयांचा असल्याची तक्रार निलंबित वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केली करून शिवसेनेला अडचणीत आणलेले आहे. याबाबत पोलिस उपायुक्त संजय बारकुंड यांनी अधिक माहिती दिल्यावर राज्यभरात खळबळ उडाली आहे. हे एक गंभीर प्रकरण आहे. कोटीच्या कोटी उड्डाणे घेऊन ठाकरे सरकारमध्ये कारभार केला जात असल्याच्या आरोपांनी हे सरकार जर्जर होत चाललेले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply