Take a fresh look at your lifestyle.

आणि केंद्र बनणार अनाथांचा नाथ; पहा नेमकी काय योजना येतेय मोदी सरकारची

दिल्ली : करोना जगात आल्यापासून या विषाणूने जगाचे नुकसानच केले आहे. करोनाने लाखो लोकांचे प्राण गेले. लाखो लोक बेरोजगार झाली. गरीबी वाढली, देशांच्या अर्थव्यवस्था उद्धवस्त झाल्या. सर्वात महत्वाचे या घातक विषाणून अनेक मुलांचे आई-वडील हिरावून नेले. माता पित्याचे छत्र हरपल्याने आता ही मुले पोरकी झाली आहेत. त्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. आता या मुलांच्या शिक्षणाचे काय, त्यांच्या भविष्याचे काय होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या संकटाच्या घडीत या मुलांना आधार देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

Advertisement

ज्या मुलांनी करोना संकटात आई किंवा वडील किंवा दोघांनाही गमावले असेल तर अशा मुलांना आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार मुलांना वयाच्या १८ वर्षी मासिक सहाय्यता राशी आणि २३ व्या वर्षात पीएम केअर्समधून दहा लाख रुपये देण्यात येणार आहेत. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेंतर्गत मुलांना मदत करण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त सरकारने मुलांच्या शिक्षणाचाही विचार सरकारने घेतला आहे. मुलांच्या मोफत शिक्षणासाठी कर्ज देण्यात येणार आहे. त्याचे व्याज सरकार देईल. आयुषमान भारत योजनेंतर्गत पाच लाखांपर्यंत आरोग्य विमाही काढण्यात येणार आहे. पीएम केअर्समधून या विम्याचे हप्ते सरकार भरणार आहे.

Advertisement

देशातील अन्य काही राज्यांनाही त्यांच्या पातळीवर काही निर्णय घेतले आहेत. करोना सकंटात आई-वडील गमावणाऱ्या मुलांना पाच लाख रुपये मदत देण्याची घोषणा तामिळनाडू सरकारने केली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनेही मुलांसाठी निर्णय घेतले आहेत. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे या मुलांना दिलासा मिळणार आहे. त्यांच्या पुढील भवितव्याच्या दृष्टीने सरकारने हा निर्णय घेतला आहे. काही राजकीय नेत्यांनीही याबाबत मागणी केली होती. त्याचाही विचार सरकारने केला आहे. करोनाच्या संकटात देशास मोठा फटका बसला आहे. लाखो लोकांचे प्राण गेले आहेत. दुसऱ्या लाटेत तर ऑक्सिजनअभावी अनेक रुग्णांचे प्राण गेले. आता करोना नियंत्रणात येत असल्याचे दिसत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. करोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे. राज्यांचा पॉझिटिव्हिटी रेट कमी होत आहे. असे असले तरी करोनाचा धोका टळलेला नाही. पावसाळ्यात करोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. तसेच तिसऱ्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे आवश्यक उपाययोजना करण्याचे नियोजन सरकारकडून सुरू आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply