Take a fresh look at your lifestyle.

दारूबंदीवाल्या गुजरातची ‘ही’ आहे व्यथा; म्हणून दोनच वर्षात तब्बल २१५ काेटी रुपयांची जप्ती

मुंबई : सुपरस्टार अभिनेता शाहरुख खान याचा रईस सिनेमा आठवतोय का? त्यातील गुजरात राज्याचे दारू रॅकेट आणि त्याचा राजकीयदृष्ट्या परिणाम स्पष्ट दाखवलेला आहे. दारूबंदी असतानाही सुरू असलेल्या या दणकेबाज व्यवसायाचे वास्तव त्यात दाखवले होते. ती फ़क़्त कथा नसून, तेच या राज्याचे वास्तव आहे. आणि आता एका बातमीने त्यावर शिक्कामोर्तबही झालेले आहे.

Advertisement

पूर्ण दारूबंदी असलेल्या गुजरात राज्यातील कच्छमध्ये पाेलिसांनी दीड काेटी रुपये किमतीची बेकायदा दारू नष्ट केल्याची बातमी ताजी आहे. पकडण्यात आलेली दारू ही एकूण मार्केटच्या एक टक्काही नसेल. कारण, इथे पोलीस आणि सरकारच्या बड्या मंत्री-संत्री मंडळींचे हात या दारूघोटाळ्यात अडकलेले आहेत. अनेक राजकीय पक्ष आणि नेते त्यावर पोलिटिकल हवा तयार करीत आहेत. वर्षानुवर्षे या राज्यात हेच चालू आहे.

Advertisement

गुजरात राज्यात दाेन वर्षांत २१५ काेटी रुपयांची बेकायदा दारू जप्त करून नष्ट करण्यात आल्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

राज्याच्या अंजारमध्ये अाॅक्टाेबर २०२० पासून मे २०२१ या काळात विक्रमी १.३० काेटी रुपयांची दारू पकडली आहे. ती दारू नष्ट केलेली आहे. संपूर्ण दारूबंदी असल्याने लपूनछपून तस्करीच्या माध्यमातून राज्यात दारूची विक्री राजरोस चालू आहे. या राज्यात फक्त ६५ परवानाधारक मद्य दुकाने असून येथे परवान्याच्या माध्यमातून मद्यविक्रीसाठी कंत्राटे दिली जात असल्याचे सरकारने म्हटलेले आहे. बेकायदा दारू विक्रीमध्ये कितीजण अडकलेले आहेत. यावर मात्र, स्पष्टपणे तिथी कोणीही बोलत नाही.

Advertisement

गुजरातनंतर बिहार या दारूबंदी असलेल्या अन्य एका राज्यात एप्रिल २०१६ पासून ते जानेवारी २०२१ पर्यंत अातापर्यंत ५१.७ लाख लिटर देशी मद्य, ९४.९ लाख लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात अाले. याप्रकरणी ३ लाख ३९ हजार ४०१ अाराेपींना अटक करण्यात अाली. यामध्ये ४७० अाराेपींना न्यायालयाने शिक्षा दिली अाहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply