Take a fresh look at your lifestyle.

म्हणून त्यासाठी बांग्लादेशाला घ्यावी लागली चीनची मदत; भारताकडून मदत मिळणार नसल्याने घेतला निर्णय

दिल्ली : भारतात करोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर आाता कमी होत आहे. मात्र, या संकटाने शेजारी देशांनाही अडचणीत आणले आहे. देशात लसींची मागणी वाढल्याने भारताने सध्या लस निर्यात बंद केली आहे. त्यामुळे या देशांना चीनकडून जादा पैसे मोजून लस खरेदी करावी लागत आहे. मात्र, दुसरा पर्यायही नाही. त्यामुळे नाईलाजाने या देशांना चीनकडून लस घ्यावी लागत आहे. बांग्लादेशात याची कार्यवाही चालू झालेली आहे.

Advertisement

बांग्लादेशात करोनाचे रुग्ण वाढत आहेत. या महामारीस आटोक्यात आणण्यासाठी देशात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. मात्र, लसींची कमतरता जाणवत आहे. भारताकडून लसी मिळत नाहीत म्हटल्यावर बांग्लादेशने चीनकडून करोना प्रतिबंधक लस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बांग्लादेश चीनकडून दीड कोटी डोस खरेदी करणार आहे. तीन महिन्यात तीन टप्प्यात या लसी बांग्लादेशला मिळणार आहेत. यासाठी मात्र बांग्लादेशला जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. कारण, याआधी भारताने पाच अमेरिकी डॉलर या दराने ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका लस बांग्लादेशला दिली होती. चीन मात्र सिनोफार्म लसीच्या एका डोससाठी दहा अमेरिकी डॉलर घेणार आहे. या देशाकडे दुसरा पर्याय नाही, त्यामुळे जास्त पैसे देऊन लस खरेदी कराव्या लागत आहेत.

Advertisement

भारतात दुसऱ्या लाटेत करोना रुग्णसंख्या वेगाने वाढली. त्यामुळे देशांतर्गत लसींची मागणी खूप वाढली आहे. देशातील राज्यांनाच सध्या लसी मिळत नाहीत. अशा परिस्थितीत दुसऱ्या देशांना लस देणे निदान आज तरी शक्य नाही. केंद्र सरकारनेही असा विचार आता बाजूला ठेवला आहे. आधी देशातील लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. त्यामुळे ज्या देशांना भारताकडून लसी मिळतील असे वाटत होते त्या देशांची आता कोंडी झाली आहे. या देशांकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे त्यांना चीनकडून लस घ्यावी लागत आहे. चीनही लस देत आहे. मात्र, जास्त किंमत आकारुन स्वतःचा स्वार्थही साधत आहे.

Advertisement

दरम्यान, याआधी अमेरिकेने काही देशांना लसी देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर चीननेही मागे न राहता आफ्रिकेतील जवळपास ४० देशांना करोना प्रतिबंधक लस देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे आफ्रिकेतील देशांना लसी मिळणार आहेत. संकट काळात या देशांच्याही अडचणी कमी होणार आहेत. तसेही जगात आज अनेक देश असे आहेत ज्यांना अजूनही लसी मिळालेल्या नाहीत. या देशांना लसी देण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने केले आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply