Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रवादी Vs काँग्रेसमध्ये पटेना; शिवसेनेचीही झालीय गोची, पुन्हा भाजपलाच ‘अच्छे दिन’ची संधी

अहमदनगर : शहरातील महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये सुरू असलेला कुरघोडीचा डाव आताच्या करोना काळातही जोमात आहे. परिणामी महापालिकेच्या सत्तेत असलेल्या भाजपला जाब विचारणारे कोणीही नाही. देशभरात करोना रुग्णासंख्येच्या आकडेवारीत पहिल्या दहामध्ये मिरवणाऱ्या जिल्ह्यातील अहमदनगर महापालिकेचे हे राजकीय वास्तव आहे. आता महापौर निवडीच्या राजकारणाच्या निमित्ताने त्याला आणखी धार आलेली आहे.

Advertisement

भाजपचे खासदार डाॅ. सुजय विखे यांनी शनिवारी स्पष्ट सांगितले आहे की, हापालिकेत आमचे संख्याबळ नाही. त्यामुळे महापाैर निवडणुकीबाबत आम्ही कोणताच निर्णय घेऊ शकत नाही. मागील निवडणुकीत राष्ट्रवादीच्या नगरसेवक मंडळींनी साथ देऊन भाजपला हे शहर ताब्यात दिले होते. आताही राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेस या तिन्ही महाविकास पक्षात स्थानिक पातळीवर बेबनाव आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला ‘अच्छे दिन’ची संधी असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

खासदार विखे यांनी महापालिकेच्या बैठकीनंतर आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली. या सभेत त्यांनी करोना आणि इतर मुद्द्यांचा आढावा घेतला. ठकीस महापौर बाबासाहेब वाकळे, आयुक्त शंकर गोरे, उपायुक्त यशवंत डांगे, नगरसेवक अनिल बोरुडे, सुवेंद्र गांधी, भय्या गंधे, नरेंद्र कुलकर्णी, धनंजय जाधव, बारस्कर, आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे उपस्थित होते.

Advertisement

महापौर या पदासाठी राष्ट्रवादी-शिवसेना-काँग्रेस यांच्यापैकी कोणतेही दोन पक्ष किंवा तिन्ही एकत्र येऊन सत्ता ताब्यात घेऊ शकतात. मात्र, स्थानिक पातळीवर असलेला बेबनाव मोठा आहे. आताही या नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्यातून विस्तव जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या अडचणीत शहराला कोणत्या पक्षाचा महापौर मिळणार हा राजकीय वर्तुळात मोठा प्रश्न बनला आहे. तर, नगरकरांच्या लेखी करोनाला मूठमाती देणे हाच महत्वाचा मुद्दा आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply