Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ ऑस्ट्रेलियाने मागितली भारताला मदत; ‘त्या’चे 5 हजार लिटर औषध रवाना..!

मुंबई : ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्स राज्यात उंदीरांच्या भीतीने लोक त्रस्त झाले आहेत. या उंदीरांमुळे केवळ शेतीच्या जमीनीचे नुकसान होत नाही तर, आता तते घरातही घुसले आहेत. घरातील विजेच्या तारा चघळत असल्याने अनेक ठिकाणी घरांना आग लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. दुष्काळाला सामोरे जाणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या शेतकर्‍यांना चांगला पाऊस पडल्यानंतर पैसे मिळतील अशी आशा होती पण उंदीरांनी त्यांची स्वप्ने मातीमोल केली आहेत. त्यासाठीच भारताने या देशाला मदत केली आहे.

Advertisement

याबाबत कृषिमंत्री अ‍ॅडम मार्शल यांनी अलीकडेच म्हटले आहे की, ऑस्ट्रेलियामधील शेतकरी आणि एकूण देश आता अशा गंभीर टप्प्यावर पोहोचला आहोत की, वसंत ऋतूच्यापर्यंत उंदीरांची संख्या कमी केली नाही तर ग्रामीण आणि प्रादेशिक न्यू साउथ वेल्समध्ये आम्हाला संपूर्ण आर्थिक आणि सामाजिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.’ उंदीरांचा प्रादुर्भाव केवळ शेती क्षेत्रापुरता मर्यादित नाही. तर आता ते घरांनाही इजा करीत आहेत. घराला आग लागल्याबद्दल एका कुटूंबाने विद्युत तार च्युइंग (चावणाऱ्या) करणाऱ्या उंदीरांना जबाबदार धरले आहे. ब्रुस बार्नेस नावाच्या व्यक्तीने सांगितले की, बोगन गेट शहराच्या मध्य न्यू साऊथ वेल्स शहराजवळील आपल्या कुटूंबाच्या शेतात पिक लागवड करून तो जुगार खेळत आहे. आम्ही फक्त पेरणी करतो आणि त्याची अपेक्षा करतो. वातावरण बदल आणि आता उंदीरच त्याला खात आहेत.

Advertisement

या उंदीरांच्या संकटाला सामोरे जाण्यासाठी तेथील राज्य सरकारने बंदी घातलेल्या ब्रोमैडिओलोन या औषधाचे 5000 लिटरची ऑर्डर भारताला दिली आहे. तेथील फेडरल गव्हर्नमेंट नियामकाने अद्याप शेती जमिनीवर हे विष वापरण्यासाठी आणीबाणीच्या अनुप्रयोगांना मंजुरी दिली नाही. बारन्स म्हणाले की, उंदीराची विष्ठा आणि मलमूत्र यामुळे अनेक भागात शेतकर्‍यांच्या पाण्याच्या टाक्या आणि घराच्या छतांवर अस्वच्छ वातावरण आणि प्रदूषित घटक वाढले आहेत. लोक या पाण्याने आजारी पडत आहेत. सरकारी संशोधक स्टीव्ह हेन्री म्हणाले की वसंत ऋतूपर्यंत किती नुकसान होईल याचा अंदाज बांधणे आताच फार अवघड आहे. हेन्री यांची एजन्सी या भागातील शेतीवरील उंदीरांचा प्रभाव कमी करण्यासाठी धोरण विकसित करीत आहे.

Advertisement
  • कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.
  • | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

Leave a Reply